Mahayuti Classes : सिंधुदुर्ग विरुद्ध रत्नागिरीच्या वादात रायगडची मध्यस्थी : तटकरेंनी टोचले राणे-कदमांचे कान

Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane : महायुतीत सध्या अनेक मुद्द्यावरून अंतर्गत वाद समोर येत आहेत. कोकणातही मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला असून वाद उफाळून आला आहे.
Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane And Mahayuti
Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane And Mahayutisarkarnama
Published on
Updated on

Konkan Mahayuti Classes : कोकणात सध्या आपआपले पक्ष वाढवण्याची स्पर्धा महायुतीतील मित्र पक्षात लागली आहे. येथील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणी वाढवत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ऑपरेश टायगरमधून शिवसेना ठाकरे गटातील मोठे चेहरे फोडत आहे. कोकणातील शिवसेना खिळखिळी होत असताना महायुतीची ताकद वाढत आहे. मात्र आता पक्ष वाढवण्याच्या या स्पर्धेत मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला असून वाद उफाळून आला आहे. यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट कानटोचणारे वक्तव्य केलं आहे.

महायुतीतील कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि राज्य मंत्री योगेश कदम यांच्यात सध्या वाद रंगला असून ते एक मेकांना डिवचताना दिसत आहेत. नितेश राणे यांनी दापोलीत जाऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला होता. त्यांनी, इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. काही चिंता करू नका आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. गृहमंत्री खातं आमच्या देवेंद्र फडणवीसांकडे आहे. एफआरआयमध्ये आज नाव आलं नसेल. कोण असेल वाचवणारे, कुठे बसलेले. पण, ते आमच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत. संबंधित खात्यातील लोकांनी ते लक्षात घ्यावं, असा इशारा दिला होता.

तर उद्या जेव्हा फडणवीसांकडे हा विषय जाईल. तेव्हा उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा तुम्हाला जे वाचवायला, फोन करायला आले होते ना. ते सगळे फोन बंद करून बसतील, हे ही लक्षात ठेवा, असाही सुचक इशारा नितेश राणेंनी दिला होता. मी नितेश राणेंना एक सल्ला देईन, की त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा, याची अक्कल आम्हाला आहे.

Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane And Mahayuti
Sunil Tatkare: ‘महाराष्ट्र धर्म’ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया! राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू!

आमी आजपर्यंत पक्षाचा झेंडा खाली ठेवला नसून जन्मापासून शिवसेनेत आहोत. बाळासाहेबांचे बाळकडू आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी समजून घ्यावं. आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे. उद्याही भगवा झेंडा राहणार", अशा शब्दात चोख प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी नितेश यांना यांना दिले.

महायुतीचे दोन मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात जुंपले असतानाच आता सुनील तटकरे यांनी थेट कानटोचणारे वक्तव्य केलं आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याची चर्चा जिल्ह्यासह राज्यभर सुरू आहे. तटकरे यांनी, नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यात एकमत जरी नाही झाले तरी जाहीरपणे याची वाच्यता करण्याची गरज नसल्याचे म्हणत दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane And Mahayuti
Sunil Tatkare : तटकरेंच्या संतापाचा कडेलोट; जलजीवनच्या ठेकेदारास दाखवला बाहेरचा रस्ता, अधिकाऱ्यांनाही फटकारलं

यामुळे महायुतीमध्ये समन्वय नाही असे काही नाही. महायुतीत एकत्र असणारे पक्ष वेगवेगळ्या विचारांचे आहेत. तसेच वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती देखील आहेत. यामुळे सर्वांचेच विचार सर्वांनाच पटतील असे नाही. पण विचार पटत नाहीत म्हणून अशा पद्धतीने जाहीर वाच्यता तरी नको, असे म्हणत दोघांनाही फटकारले आहे.

तसेच यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या चर्चेत असणाऱ्या ठाकरे-ठाकरे आणि पवार-पवार युतीवर देखील भाष्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे-ठाकरे आणि पवार-पवार एकत्र यायचं काही ते बघून घेतील. ते त्यावर निर्णय घेतील असे म्हटलं आहे.

Sunil Tatkare on Yogesh Kadam Nitesh Rane And Mahayuti
Sunil Tatkare : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफी मिळणार? तटकरेंनी दिले संकेत; म्हणाले, 'आमचा यू टर्न...'

पण सध्या कोकणात सुरू असणाऱ्या निरेश राणे-योगेश कदम वादावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी याचा फटका महायुतीला बसणार नाही. महायुतीची इमेज खराब होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com