uddhav thackeray, raj thackeray
uddhav thackeray, raj thackeray Sarkarnama

Raj Thackeray Surprise: उद्धव ठाकरेंना वाढदिनी दिले 'हे' सरप्राईज; मातोश्रीवर ठाकरे बंधुंची सहा वर्षानंतर गळाभेट

thackeray brothers reunion News : रविवारी अचानक राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याने येत्या काळात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का ? या चर्चेला उधाण आले आहे.
Published on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे यांनी 20 वर्षानंतर एकत्र येत विजयी मेळावा साजरा केला. त्यानंतर 22 दिवसातच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने राज ठाकरे सहा वर्षानंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर दाखल झाले. या पुर्वी ते उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर बरेच दिवस ते मातोश्रीवर गेले नव्हते. रविवारी अचानक ते मातोश्रीवर गेल्याने येत्या काळात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का ? या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, ठाकरे बंधूमध्ये यावेळी 20 मिनिटापेक्षा अधिक काळ विविध विषयवार चर्चा झाल्या.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा गेल्या 20 वर्षांपासून चर्चेचा विषय होता. त्यामुळेच राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने सरप्राईज भेट दिली. राज ठाकरे या पूर्वी जानेवारी 2019 मध्ये त्यांचा मुलगा अमित यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर गेल्या सहा वर्षात त्यांनी मातोश्रीकडे कधी वाट वळवली नव्हती. 5 जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यानंतर या महिन्यात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. या वेळी दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.

uddhav thackeray, raj thackeray
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे 'मातोश्री'वर, 22 दिवसांत दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंना भेटले, कारणही आहे खास!

भेटताच ठाकरे बंधूंनी मारली मिठी

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर सहा वर्षांनंतर आले होते. यावेळी दोन बंधूंची भेट ही एक भावनिक घटना ठरली. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर येणार असल्याचे समजताच त्यांचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मातोश्रीच्या गेटवर उभे होते. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मिठी मारली. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या हातात गुलाबांचा मनमोहक पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.

uddhav thackeray, raj thackeray
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे 'मातोश्री'वर, 22 दिवसांत दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंना भेटले, कारणही आहे खास!

राजकीय दृष्ट्या एकत्रित येणार का?

राज व उद्धव ठाकरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय वाटांची निवड केली होती. मात्र, गेल्या महिन्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोघांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीचे जीआर मागे घेतले होते. त्यामुळे त्यांनी 5 जुलैला एकत्र येत विजयी मेळावा सादर केला होता. यामुळे भविष्यातील समीकरणांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वानाच ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित येणार का? याची उत्सुकता लागली आहे.

uddhav thackeray, raj thackeray
रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई, Raut यांचे Girish Mahajan यांच्यावर आरोप।Pune Rave Party | Rohini Khadse

जुन्या आठवणींना दिला उजाळा

ठाकरे कुटुंबाला राजकीय दृष्ट्या खूप मोठे वलय आहे. त्यांच्या प्र्त्येक हालचाली व घडामोडी सार्वजनिक लक्ष वेधून घेतात, त्यामुळे ही भेट विशेष ठरली आहे. यावेळी मातोश्रीमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोरच दोघांनी गळाभेट घेतली. त्यासोबतच जुन्या आठवणींना उजाळा देत राज यांनी मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरे बसत असलेल्या खुर्चीचे दर्शन घेतले. त्यासोबतच व्यंगचित्रावर देखील यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळेच अचानक राज ठाकरे यांची मातोश्रीवर जाण्याची कृती अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

uddhav thackeray, raj thackeray
BJP Mahayuti Bhandara Bank : गोंदिया, चंद्रपूर जिंकले, आता महायुतीचे लक्ष भंडारा बँकेकडे; पटोले अन् पटेल यांच्या वर्चस्वाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com