Thackeray brothers meeting : ठाकरे बंधू दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेटले! नव्या राजकीय समीकरणांचा श्रीगणेशा की मोठा राजकीय स्फोट?

Maharashtra politics 2025 News : मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यावेळेसपासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Raj Thackeray invites Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषता आगामी काळात होत असेलल्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने केली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत. त्यानंतर ५ जुलैला दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र येत मेळावा साजरा केला होता. त्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यावेळेसपासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली तर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू गणपतीच्या उत्सवानिमित्त पुन्हा एकत्र आले आहेत. 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच दादर शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्या या भेटीनंतर येत्या काळात आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने नव्या राजकीय समीकरणांचा श्रीगणेशा होणार असल्याने त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ठाकरे बंधू गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेटले आहेत. दोघांच्या राजकीय मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कौटुंबिक भेटीगाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. दोघेजण गणेशचतुर्थीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घरी हजेरी लावली. कौटुंबिक गप्पा, स्नेहभोजन आणि हसऱ्या फोटोशेनने या भेटीबद्दलचं कुतूहल वाढवले आहे.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Raj Thakeray : राज ठाकरे हे फडणवीस, शिंदेंना झटका अन् काँग्रेस, पवारांना सुखद धक्का देतील?

विशेष म्हणजे 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर भेटीसाठी गेले होते. त्याची उत्सुकता सर्वाना होती. गेल्या काही दिवसापासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पडद्याआड हालचाली सुरु आहेत. विशेषता दोन्ही बंधूमध्ये बैठकाही झाल्या आहेत. मात्र, युतीबाबतचा सस्पेन्स मात्र, अद्याप संपलेला नाही.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
BJP Vs Shivsena UBT Politics: प्राणघातक हल्ल्यातील युवक चिंताजनक, भाजप नेते उद्धव निमसे यांची अटक पूर्व जामीनासाठी धाव!

नव्या युतीचा श्रीगणेशा होणार का ?

बुधवारी झालेल्या भेटीदरम्यान ठाकरे बंधूमध्ये बंद दाराआड 15 ते 20 मिनिट दोघांमध्ये चर्चा झाली आहे. यावेळेस काय चर्चा झाली याची माहिती समजू शकली नसली तरी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. येत्या कळत होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित आले तरच महायुतीच्या विरोधातील निवडणूक ठाकरे बंधूंना सोपी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीवेळी नव्या युतीचा श्रीगणेशा होण्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar : संग्राम थोपट्यांना पैसे देण्यास अजितदादांचा नकार? फडणवीसांनी थेट मुद्द्यालाच हात घातला अन्...

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत ठाकरे बंधू जुने राजकीय मतभेद विसरून आता एकत्र येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिका एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला राहिली आहे. मात्र तीन वर्षापूर्वी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे येत्या काळात कस लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघे एकत्र येत असल्याने ही निवडणूक दोन्ही भावाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे हे दोघे एकात आल्यास खास करून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनासाठी हा एक प्रकारचा चेक-मेट असणार आहे.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Manoj Jarange On Eknath Shinde : 'एकनाथ शिंदेंना बोलू दिलं जात नाही', मुंबईला निघताना जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत या दोन्ही भावाला होणार आहे. मुंबईत मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. त्याचा फायदा शिवसेना व मनसे युतीला होणार आहे. त्यासोबतच नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिल्याचा त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही बंधूनी एकत्र येत निवडणूक लढवल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil Update : मनोज जरांगेंचे टार्गेट फक्त फडणवीस का? बावनकुळे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com