Ram Raksha Andolan : उद्धव ठाकरेंचा 'रामरक्षे'चा मास्टरस्ट्रोक! पुन्हा 'हिंदुत्व' कार्ड काढल्याने भाजप की मित्रपक्ष... कोणाचा गेम होणार?

Shivsena UBT News : येत्या काळात भाजपची कोंडी करण्यासाठी दोन दिवसापूर्वीच रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यासोबतच दादर येथे आंदोलन करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तिय सचिन अहिर यांना फोडत विधान परिषदेचे उपसभापतिपद दिले आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला करण्याचे प्लॅनिंग केल्याचे दिसत आहे.

येत्या काळात भाजपची कोंडी करण्यासाठी दोन दिवसापूर्वीच रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यासोबतच दादर येथे आंदोलन करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता भविष्यतील ठाकरे सेनेची वाटचाल पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरत आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दादर येथील आंदोलनात रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) व सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यामुळे संधी मिळताच ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाची वाट धरली आहे की काय हा प्रश्न उपस्थित होतोय कारण अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाविरोधात ठाकरे सेनेने केलेले रामरक्षा आंदोलन. या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा "गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा देत सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Strategy Fail : उद्धव ठाकरेंचे नेमकं काय चुकलं? दुसऱ्यांदा खासदार फुटले! 'हे' आहेत कमजोर दुवे

खासदार फोडल्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) ताकद कमी झाली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे वजन वाढले आहे. ठाकरेंचे एकएक शिलेदार सोडून जात आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. या पार्श्वभूमिवर राजकारणात यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास धरु पाहत आहेत, का अशी चर्चा यानिमित्त्ताने सुरु झाली आहे.

रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात हिंदुत्वापासून दूर जात असल्याची त्यांच्यावर टीका केली जात होती. त्याचा काही प्रमाणात फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळवलेले यश त्यांना विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळवता आले नाही. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
BJP Vs MNS: 'मी फुसक्या अन् बिनविषारी सापांबद्दल...', भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच राज ठाकरेंवर जिव्हारी लागणारा वार

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर निवडून आणलेले सहा खासदार पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आहेत. त्यामुळे ठाकरे यांची अडचण झाली आहे. त्यासोबतच येत्या काळात विधानसभेतील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरोधात वातवरण तापविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Maharashtra Political Crisis : शिंदेंकडे जाणार की परतणार? ओमराजेंच्या सूचक वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, 'माझा संपर्क..?'

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंनी नेहमीच रामरक्षा म्हणावी, असा टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. खरंतर, उद्धव ठाकरेंनी 2019 साली भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवी युती केली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपसह स्वपक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला होता.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. तर शिंदे सेनेचे वजन वाढले आहे. उद्धव ठाकरेंचे एक-एक शिलेदार त्यांची साथ सोडून जात आहेत. एकीकडे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. या पार्श्वभूमिवर राजकारणात यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास धरु पाहत आहेत, अशी चर्चा मात्र पुन्हा एकदा यानिमित्ताने रंगली आहे. रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com