Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

Kokan Shivsena News: शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर गेली चार वर्षे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Uddhav Thackeray, Narayan Rane
Uddhav Thackeray, Narayan RaneNarayan Rane
Published on
Updated on

Shivsena News: शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर गेली चार वर्षे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एक एक कोकणातील गड खालसा होत असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मंत्री व भाजप नेते नितेश राणेंच्या मतदारसंघातच ताकद वाढली आहे.

कोकणातील सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.भाजपचे आक्रमक नेते व आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठा डाव टाकला आहे. यामुळे ठाकरेंना नेर्ले गावच्या सरपंचांसह वैभववाडीतील शेकडो कार्यकर्त्यांना फोडण्यात यश आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक, परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी नेर्ले भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या गावच्या सरपंच,उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

उद्धव ठाकरेंनी कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. प्रमुख नेत्यांसह कोकणच्या गडात शिवसेनेची पुनर्बांधणीसाठी पाऊल टाकतानाच विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचे आदेशही ठाकरेंनी यावेळी दिल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray, Narayan Rane
Daregaon visit News : नाशिकमध्ये शिवसेनेचा प्राण कंठाशी आला असतानाच एकनाथ शिंदे दरेगावला : दिल्लीतून ताफा थेट गावाकडच्या शेतात

कोकणातील वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली. हा पक्षप्रवेश मंत्री नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. कित्येकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे खासदार व आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातो. तर ठाकरेंकडूनही पलटवार करताना त्या खासदार आमदारांची नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलं जातं. या दावे-प्रतिदाव्यांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

Uddhav Thackeray, Narayan Rane
Girish Mahajan: 'नाशिक'च्या निवडणुकीत 'संकटमोचका'ची झाली दमछाक; तटून राहिलेल्या गोकुळ गितेंच्या माघारीसाठी अख्खं सरकारच लागलं कामाला

याचदरम्यान, आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर राबवत नसून ज्यांना आमच्यासोबत यायचे असेल त्यांना आम्ही नकार देणार नाही. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. योग्यवेळ आली तर पुढचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com