Mumabi News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेचे वर्चस्व आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची तयारी सुरु केली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेले 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावले आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वरळी येथील ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडल्यानंतर मुंबईत सर्व्हे केला असून यामध्ये येत्या काळात एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी होणार असल्याचे पुढे आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूची राजकीय युती होणार की नाही अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने चाचणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) केलेल्या सर्व्हेमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत १०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
या सर्व्हेमध्ये राज ठाकरे (Raj thackeray) यांच्या मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्व्हे करण्यात आला आहे. या अंतर्गत सर्व्हेमध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत जागा 2012 च्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 75 तर भाजप 71 जागा मिळाल्या होत्या तर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 तर मनसेने सात जागा जिंकल्या होत्या.
मराठी मतदारामध्ये शिवसेनेचा मुख्य आधार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसेमध्ये मराठी मताचे विभागणी होणार आहे. पण यात मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतासोबतच मुस्लिम समाजाची मते देखील मिळतील. हे गुप्त समीकरण महापालिका निवडणुकीचे गणित बदलू शकते. शिंदे यांच्या शिवसेनेकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ४० पेक्षा अधिक माजी नगरसेवक आले असले तरीही दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्यापुढे पक्ष सोडून गेलेले माजी नगरसेवक निष्प्रभ ठरतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे.
विशेषतः मराठी मते असलेल्या गिरगाव, माझगाव, ताडदेव, लालबाग, परेल, भोईवाडा, दादर, माहीम, जोगेश्वरी, वांद्रे, मागठाणे, गिरगाव, मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी आधी भागात मराठी व्होट बँक मोठी असून ती निर्णायक ठरणार आहे. या भागातून ठाकरे बंधूंची युती झाली तर त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात.
दुसरीकडे आगामी काळात जर ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचे होणार आहे. त्यांच्या केवळ त्यांच्या दहा जागा येतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे जर येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेची सत्ता राखताना अपयश येणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.