
Kokan Politics News : राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च आदेशामुळे लवकरच निवडणुका लागणार असून राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. तळकोकणात देखील याची जय्यत तयारी सुरू पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यासह नेमकं चेहरे हेरून त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणत आहेत. यामुळे सर्वात मोठे नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होताना दिसत आहे. पण येथील दोन प्रमुख शिलेदार मात्र कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत. याउटल या प्रमुख दोन शिलेदारांची तोंडं वेग वेगळ्या दिशेला असल्याने पक्षात मात्र आलबेल नसल्याचेच उघड होत आहे.
तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन टायगर राबवले आहे. यामुळे अनेक मोठ्या चेहऱ्यांसह स्थानिक पातळीवरून नेतेही ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहेत. यातच कोकणातील ठाकरेंचे एकमेव आमदार असणारे भास्कर जाधव यांनी देखील नुकताच नाराजीचा बॉम्ब टाकल्याने शिवसेना बॅकफूटवर आणखी गेली आहे. तर आपल्या नाराजीचे कारण भास्कर जाधव यांनी पक्षातील बड्या नेत्यांवर व्यक्त केली आहे. ज्यात माजी खासदार विनायक राऊत यांचाही समावेश आहे.
विनायक राऊत आणि भास्कर जाधव एकाच जिल्ह्यातील नेते असूनदेखील येथे वेगळे चित्र आहे. सध्या ते शिवसेना मजबूत करण्यासह स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मोट बांधताना दिसत आहेत. याची सुरूवात त्यांनी चिपळूनमधून केली आहे. मात्र तेही वेग वेगळे. आता त्यांच्या या 'एकला चलो' च्या भूमिकेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
स्थानिकच्या निवडणुका गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून रखडल्या आहेत. आता त्या सर्वोच्च आदेशानंतर होणार आहेत. याची प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू असून चिपळूण पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजप मैदानात असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 9 जागा आणि पंचायत समितीच्या 18 जागांसाठी येथे लढत होणार असून सध्यातरी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच स्पर्धा असेल. सध्या येथील राजकीय जमवाजमव पाहता मविआत ताळमेळ असल्याचे दिसत नाही. मात्र शिवसेनेनं (ठाकरे) निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
ठाकरेंचे दोन शिलेदार स्वतंत्र बैठकांच्या करताना दिसत आहेत. लोकसभेला रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेकडून गेली. येथे भाजपचे नारायण राणे निवडून आले. यामुळे विनायक राऊत आगामी स्थानिकच्या तयारीला लागले असून मतदार संघात फिरताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली होती. तसेच ते निवृतीच्या गोष्टी करत असल्याने देखील शिवसेनेत स्थानिक पातळीवर चुळबूळ सुरू झाली होती. पण त्यांनी आपली नाराजी बाजूला करत स्थानिकसाठी पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे.
भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये शाखाप्रमुखांचा मेळावा घेतला. तर राऊत यांनी चिपळून-संगमेश्वरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. हे दोघे एकत्र येऊ बैठका घेतील असे वाटतं होते. मात्र विनायक राऊत यांनी दौरा रद्द केला आणि जाधव यांनी टाईमिंग साधत पदाधिकाऱ्यांची झडती घेतली. तसेच वरिष्ठांवर देखील तोफ डागली.
पण यापेक्षीही अधिक चर्चा ही जिल्ह्यात दोन्ही नेते एकत्र येण्याचे का टाळत आहेत? आगामी काळात तरी हे एकत्र येतील का? याची होत आहे. तर आगामी काळात तरी मेळावे आणि बैठकांच्या पार्श्वभूमिवर एकत्र येतात का? किमान स्थानिकला तरी शिवसेनेचा गड राखण्यात नेते कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर आता शिवसेना आण मनसे एकत्र येण्याचे संकेत मिळत असून आजच (ता.5) मुंबईत ठाकरे बंधुंचा मेळावा झाला आहे. याचाही जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे.
दरम्यान विनायक राऊत यांनी, आम्ही दोघेही एकाच पक्षासाठी काम करत आहोत. पक्षाला गत वैभव मिळवून देणे हेच आमचे दोघांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोघेही मिळून आगामी काळात जिल्ह्यात प्रचाराच्या सभा घेणार आहोत. सध्या प्राथमिक स्तरावर याची चाचपण सुरू असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.