Mahayuti strategy change : ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे बलाढ्य महायुतीने बदलली रणनीती? मुंबईत एकत्र लढण्यावाचून पर्यायच नाही!

Mumbai political alliance News : भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सध्या सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार यावर चर्चा सुरु असल्याने एकमत झाले नव्हते. मात्र, आता महायुतीचा निर्णय जवळपास ठरला असून मुंबई महापालिका वगळता महायुती एकत्र लढणार नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे लक्षात येताच त्यांच्या एकत्र ताकदीमुळे बलाढ्य महायुतीने रणनीती बदलली आहे. मुंबईत एकत्र लढण्यावाचून पर्यायच उरला नसल्याने महायुती एकत्र लढणार आहे. तर दुसरीकडे भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. या ठिकाणी नेमके चित्र काय असणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे. त्यामुळे त्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. मुंबई पालिका निवडणूक सुरुवातीला भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे व एकनाथ शिंदेची शिवसेना व काँग्रेस स्वबळावर लढतील, असा अंदाज होता. मात्र, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे बंधूंनी येत्या काळात युती करून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) एकत्र आली तर त्यांच्या ताकदीमुळे बलाढ्य महायुतीने रणनीती बदलली आहे. मुंबईत एकत्र लढण्यावाचून पर्यायच उरला नसल्याने महायुती एकत्र लढणार आहे. भाजपने देखील मुंबई महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढविण्याचे ठरवले आहे. तर मुंबई सोडून इतरत्र महायुतीमधील तीनही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे समजते.

Mahayuti Government
Manikrao Kokate : कोकाटे मंत्री राहतील पण..., अजितदादांच्या 'वॉर्निंग'नंतर फडणवीस अन् तटकरेंच्या बैठकीत प्लॅन ठरला!

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसापासून भाजपच्या विरोध वातावरण निर्मिती केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा कसलाच फटका बसू नये याची दक्षता भाजपकडून (BJP) घेतली जात आहे. त्यामुळेच येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्याचे प्लॅनिंग भाजपने केले आहे.

Mahayuti Government
BJP Politics: संविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी पात्रता असेलच असं नाही! भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतंय?

मुंबई वगळता आता इतर ठिकाणी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार नाही. त्यामुळे तीनही पक्षाने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिकेचा विचार करता या ठिकाणी भाजपची स्वबळावर सत्ता होती. तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात लढून दुसऱ्या क्रमांकावर होती. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे येत्या काळात हे तीन पक्ष स्वबळावर निवडणूक लढणायची शक्यता आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढा होण्याची शक्यता आहे.

Mahayuti Government
Manikrao Kokate Politics: काँग्रेसचे स्पष्टीकरण, कृषिमंत्री कोकाटे यांचे स्वागत केलेच नाही, कोकाटे यांनीच केला आमचा सत्कार अन् दिल्या शुभेच्छा!

ठाणे महापालिकेत महायुती वेगळी लढणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ठाणे महापालिकेवरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे याठिकाणी ते स्वबळावर निवडणूक लढतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आतापर्यांतचे निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला राहिला आहे. यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ठाणे महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष तयारी करीत असले तरी या ठिकाणी नेमके चित्र काय असणार? याची उत्सुकता लागली आहे.

Mahayuti Government
Rohit Pawar Vs Shankar Mandekar : आमदार शंकर मांडेकरांची रोहित पवारांना धमकी? स्वतः सांगितले ईडीला घाबरत नाही तुम्ही तर...

या निर्णयामुळे नेमके काय होणार?

महायुतीने मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनुसार उमेदवार उभे करणार आहे. मुंबई महापालिकेत मात्र एकत्र येण्याच्या विचारामागे आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोन आहे. मुंबई महापालिकेचा मोठा अर्थसंकल्प आणि शहराचे महत्त्व लक्षात घेता, एकत्र लढल्यास विजयाची शक्यता वाढते. इतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा यांमध्ये पक्ष स्वतंत्रपणे लढतील, जेणेकरून स्थानिक स्तरावर आपापली ताकद सिद्ध करता येईल, असे या मागचे कारण असण्याची शक्यता आहे.

Mahayuti Government
Rohit Pawar: कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कसा मिळाला? रोहित पवारांचा मोठा खुलासा

राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार ?

महायुतीच्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावरील स्पर्धा वाढणार आहे. महायुतीतीलच दोन घटकपक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यामुळे मतविभाजन होऊ शकते. विकासकामे आणि लोकप्रियतेचा कस लागणार असून पक्ष स्थानिक उमेदवारांच्या कामगिरीवर आणि जनसंपर्कावर अवलंबून राहबणार आहेत. येत्या काळात ज्याठिकाणी महायुतीचे मतविभाजन होईल, त्या ठिकाणी विरोधकांना संधी मिळणार आहे. महाविकास आघाडी किंवा अपक्षांना काही ठिकाणी फायदा होवू शकतो.

Mahayuti Government
Mahadev Munde : गळा चिरला, मानेसह हातावर 16 वार...; महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती आली समोर

महायुतीच्या या धोरणामुळे स्थानिक राजकारणात चुरस वाढणार आहे. मुंबईत महायुती मजबूत राहील, पण इतर ठिकाणी स्थानिक ताकद, विकासकामांची पार्श्वभूमी, आणि जनतेचा कल यावरच निकाल ठरणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक पक्षाची ताकद, स्थानिक नेतृत्वाची लोकप्रियता, आणि प्रचार मोहिमेतील रणनीती यासाठी मुंबई वगळता भाजपकडून करण्यात आलेली स्वबळाची घोषणा निर्णायक ठरणार आहे.

Mahayuti Government
NCP SP Politics : शरद पवारांचा पक्ष भाकरी फिरवणार? कोणाला संधी आणि कोणाला बाहेरचा रस्ता, नव्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com