Thane Political : आदित्य ठाकरेंच्या भेटीने धावेल दिघा रेल्वेस्थानकातून लोकल ?

Aaditya Thackeray Digha Railway Station : स्थानक तयार होऊनही आठ महिन्यांपासून पडले धूळ खात; उद्घाटनाची प्रतीक्षा...
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

- पंकज रोडेकर

Thane Political News : ठाणे आणि नवी मुंबई या दोन शहराच्या वेशीवर दिघा रेल्वेस्थानक तयार होऊनही गेले सात ते आठ महिने लोकल धावण्याच्या प्रतीक्षेत आहे. या स्थानकातून आज किंवा उद्या तरी लोकल धावेल, याकडे स्थानिक नागरिक व नोकरदार डोळे लावून बसले आहेत. त्यांचे होणारे हाल पाहून शिवसेना ठाकरे गटाकडून या स्थानकातून तत्काळ लोकल सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली आहे.

मात्र आगामी निवडणुकीत हा श्रेयवादाचा जुमला होऊ शकतो. या भीतीने त्या मागणीकडे जाणिवपूर्वक कानाडोळा कोण करीत आहे समजत नाही. त्यामुळे आता आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हा मुद्दा हाती घेत, स्थानकाला भेटी दिल्याने लवकरच लोकल धावणार असेच दिसत आहे. ठाणे व कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघाला जोडणारा ऐरोली - कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात तयार झालेले दिघा रेल्वेस्थानक आहे.

Aaditya Thackeray
Kapil Patil Politics : निवडणूक तोंडावर आली अन् कपिल पाटील...

दिघा रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 90 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तयार रेल्वेस्थानक धूळ खात पडलेले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व तेथे येणारा नोकरदारवर्ग रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे ठाकरे गटाकडून दिघा रेल्वेस्थानक तत्काळ सुरू करा, अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्यंतरी नवी मुंबईतील भाजपानेही हे स्थानक सुरू व्हावे, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना गळ घातली होती. मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे रेल्वेस्थानकात हार्बर रेल्वेमार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वेस्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन 40 टक्के गर्दी कमी होणार आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदारवर्ग थेट नवी मुंबईमध्ये येऊ - जाऊ शकणार आहेत.

तरीसुद्धा ते स्थानक अजून का सुरू होत नाही, हे समजू शकत नाही. त्यातच प्रवाशांचे होत असलेल्या हाल श्रेयवादाला तर महत्त्व दिले जात नाही, अशीच पाल चुकचुकत आहे. प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी धावून आले आहेत. त्यांनी प्रत्यक्षात स्थानकाला भेट देत पाहणी करीत आढावा घेतला आहे. त्यामुळे दिघा रेल्वेस्थानकातून लोकल धावेल असेच दिसत आहे.

(Edited by Amol Sutar)

Aaditya Thackeray
Hingoli Lok Sabha : हिंगोलीतून हेमंत पाटीलच फिक्स, आमदार बांगरांनी गुलाबही उधळले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com