

Ashok Kharat darbar issue explained: महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या भोंदू बाबाच्या प्रकरणाला आता ठाण्यातून धक्कादायक वळण मिळालं आहे. कथित भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याचं ठाणे कनेक्शन उघड झाले आहे. या प्रकरणात एका बड्या आणि वादग्रस्त माजी अधिकाऱ्याचं नाव समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अशोक खरातच्या ‘दरबारात’ ठाण्यातील आणखी किती पांढरपेशे ये-जा करत होते, याचा छडा लावण्याचे काम गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात लवकरच मोठे खुलासे आणि अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यातील माजी अधिकारी महेश अहेर (Mahesh Aher) हा केवळ खरातचा ‘भक्त’ नव्हता, तर त्यानेच ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याला खरातच्या जाळ्यात ओढल्याचा गंभीर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला विश्वासात घेऊन थेट नाशिकमधील खरातच्या कार्यालयावर नेण्यात आलं. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध कथित जादूटोणा, लिंबू फिरवणे आणि जबरदस्तीने ‘मोती’ घालण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकारामुळे पीडित महिलेला मानसिक छळ सहन करावा लागल्याची माहिती समोर येते.
या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या तपासाला वेग आला आहे. विशेष म्हणजे, महेश अहेर यांचा यापूर्वीच अनेक वादांशी संबंध राहिला आहे.
आता या नव्या खुलाशामुळे त्यांच्यावर संशयाची सुई अधिकच तीव्र झाली आहे.पाचव्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या खरातविरोधात आता ईडीची देखील एन्ट्री झाली आहे. अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे संबंध असल्याचे दावे-आरोप झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.