

विरार : राज्यात शिवसेने (Shivsena) नंतर मनसे (MNS) बरोबर युती (Allliance) करण्याचे प्रयत्न भाजपच्या (BJP) प्रदेश नेतृत्वाने अनेक वेळा सुरु केले असतानाच आता वाडा (Wada) येथे हि युती आकाराला आली आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या महापालिका, (Corporations) नगरपालिका (Cauncil) आणि ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकीतही हि युती कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसांठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. आता पर्यंत भाजपने शिवसेनेला सोडल्यावर एकट्याने इतर पक्षा बरोबर लढत होत होती. आता हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे.
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने 15 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या जागांवर 5 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असून भाजप विरोधी पक्ष आहे. आता होणाऱ्या निवडणूकीत भाजप व मनसे यांच्यात युती झाल्याचे आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी वाडा येथील भाजप कार्यालयात जाहीर केले.
यावेळी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे उपस्थित होते. भाजपला या निवडणुकीत अगोदरच कुणबी सेनेने आपला पाठींबा दिला असल्याने महाविकास आघाडीच्या विरोधात येथील लोकमत जात असल्याचे बोलले जात आहे.
मनसे आणि भाजपच्या युतीमुळे या निवडणुकीत खरोखरच काही बदल होतो का? यासाठी देखील दोन्ही पक्ष एकमेकाला अजमावताना दिसतील. त्यामुळे हि निवडणूक म्हणजे भाजप आणि मनसे युतीची चाचणी मानली जाते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.