Kalyan News : कल्याण डोंबिवली पालिका : नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत

Town Planing या प्रकरणी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्या विरुद्ध बोगस कागदपत्रांसंबंधी तक्रार केली होती.
Kalyan Dombivali Muncipalty
Kalyan Dombivali Muncipaltysarkarnama
Published on
Updated on

Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागातील सर्व्हेअर बाळू बहिराम, आलेखक राजेश बागुल या कर्मचाऱ्यांना बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री चौकशीनंतर अटक केली. नगररचना विभागात मागील १५ वर्षांपासून ठराविक कर्मचारी एकाच पदस्थापनेवर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी आयुक्तांच्या आदेशावरून बदल्या झाल्या होत्या. आयुक्त बदली होताच पुन्हा हे कर्मचारी सहायक संचालक नगररचना, सामान्य प्रशासन विभागाशी संगनमत करून नगररचना विभागात दाखल झाले आहेत.

नगररचना विभागातील एका कर्मचाऱ्याकडे डोंबिवली पश्चिमेत महाराष्ट्रनगरमध्ये विनोद बिल्डर्सचे मालक विनोद किसन म्हात्रे , रमेश कचरू म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी नगररचना विभागात सहा माळ्यांच्या इमारतीचा आराखडा जुलै २०२१ मध्ये मंजुरीसाठी दाखल केला होता. आराखडा दाखल करताना विनोद बिल्डर्सने भूमिअभिलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत आराखड्यासोबत सादर केला होता.

या आराखड्यानुसार खासगी जमिनीलगतची गुरचरण असणारी सहा गुंठे जमीन खासगी मालकीत दाखविण्यात आली होती. आराखडा मंजुरीपूर्वी सर्व्हेअर बाळू बहिरम, आलेखक राजेश बागुल यांनी विनोद बिल्डर्सच्या जमिनीचा प्रत्यक्ष स्थळ सर्व्हे करून जमिनीचे अचूक रेखांकन करणे आवश्यक होते. या प्रस्तावात गुरचरण जमिनीचा समावेश आहे, नऊ मीटरचा पोहाेच रस्ता येथे उपलब्ध नाही, हे सर्व्हेअरने नगररचना विभागाच्या निदर्शनास आणले नाही.

Kalyan Dombivali Muncipalty
Kalyan News : आमदार गायकवाड यांच्या बंधूच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण; नेमकं काय घडलं?

विकासकाने दाखल केलेला प्रस्ताव योग्य असल्याचा शेरा लिहून बहिराम, बागुल यांनी प्रस्ताव तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे पाठविला. तत्कालीन सहायक संचालक मारुती राठोड यांनी विनोद बिल्डर्सचा प्रस्ताव योग्य समजून मंजूर केला. विकासकाने सहा माळ्यांची इमारत बांधली. दरम्यानच्या काळात पालिकेची परवानगी न घेता पाच बेकायदा मजले या अधिकृत इमारतीवर बांधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बेकायदा मजल्यांप्रकरणी, या इमारतीसाठी सहा गुंठे गुरचरण जमिनीचा वापर केला आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक रमेश पद्माकार म्हात्रे यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी झाली. भूमिअभिलेख विभागाने विनोद बिल्डर्सने पालिकेत दाखल केलेला नकाशा आम्ही दिला नसल्याचे स्पष्ट केले. अधिकृत इमारतीवर पाच बेकायदा माळे बांधल्यावर या बांधकामाला परवानगी देण्याचा सुधारित प्रस्ताव विकासकाने पालिकेत दाखल केला.

Kalyan Dombivali Muncipalty
Dombivali Politics : 'त्या' घटनेनंतर डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना नेते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र!

बोगस मोजणी नकाशाच्या आधारे या इमारतीला परवानगी देण्यात आल्याने माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून सहायक संचालक नगररचना दिशा सावंत यांनी विनोद बिल्डर्सची बांधकाम परवानगी रद्द केली. या प्रकरणी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्या विरुद्ध बोगस कागदपत्रांसंबंधी तक्रार केली होती. पोलिस चौकशीत सर्व्हेअर बहिराम, बागुल दोषी आढळले आणि त्यांना कोर्टात आज हजर करण्यात आले व कोर्टाने त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Kalyan Dombivali Muncipalty
Kalyan Dombivli News : रिपाइंचे नेते ऑन फिल्ड, ओस पडलेले कार्यालय अखेर गजबजले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com