Loksabha Election 2024 : डॉ. संजीव नाईकांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, मला कोणाकडूनही कसलीही ऑफर नाही...

Dr. Sanjeev Naik माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Ex MP Dr. Sanjeev Naik
Ex MP Dr. Sanjeev Naiksarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : ही निवडणूक संजीव नाईक यांची नाहीतर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. जे मोदी ठरवतील ते संजीव नाईकला कशाला सर्वांनाच म्हणजे तिन्ही पक्षांना मान्य असणार आहे. तसेच संजीव नाईकांना कुठलीही ऑफर कोणीही दिलेली नाही, असे मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईकांनी स्पष्ट केले.

मंगळवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक यांनी शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कोणी, कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय जो खेळाडू रोज समुद्रात होतो, त्याला स्वीमिंग पूलच्या टॅंकमध्ये जायची गरज नसते, असेही ते म्हणाले.

महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि तो मोदींनी दिलेल्या 'अब की बार 400 पार' या नारामध्ये असेल. याशिवाय तो नरेंद्र मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल, असा विश्वास ही डॉ. संजीव नाईक यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. पण, तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. याबाबत वरीष्ठ नेतेमंडळी निर्णय घेतली.

Ex MP Dr. Sanjeev Naik
Thane Lok Sabha Election 2024 : ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात थेट सामना? विचारेंविरोधात 'हा' नेता मैदानात उतरू शकतो

तसेच भाजपची सर्व तयार झालेली आहे. शिवाय भाजप असो शिवसेना या राष्ट्रवादी याची रचना वेगळ्या पद्धतीच्या आहे. तिघांची रचना एकत्र करून महारचना तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच उमेदवार लवकरच निश्चित होईल, पण हा गड वेगळ्या पद्धतीने लढवला जाईल असा विश्वासही या वेळी नाईकांनी व्यक्त केला. गत निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांनी मिळून ठरवलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या ठिकाणी बरेच लोक सुट्टीमध्ये गावाकडे जातील. सोमवारच्या दिवशी मतदान आहे. त्याच्यामुळे शनिवार, रविवार, सोमवार हे तीन दिवस पकडून गावी जाण्याची किंवा फिरायला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ते मतदानादिवशी बाहेर जाऊ नये. म्हणून आमचा प्रचार त्याच्यावर जास्त असणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे यासाठी प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

R

Ex MP Dr. Sanjeev Naik
Thane News : तुम्ही महायुतीचा धर्म तोडणार, मग आम्ही का पाळावा? शिवतारेंच्या मुद्द्यावरून परांजपेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com