Naresh Mhaske : नरेश म्हस्केसाठी ह्या गोष्टी ठरल्या गेमचेंजर

Lok Sabha Election Constituency Results : नवी मुंबईतील शिंदे गटाच्या नेते आणि भाजप आमदारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे नरेश म्हस्केंना विजयाचे तोंड पाहता आले
Eknath Shinde on Naresh Mhaske Victory
Eknath Shinde on Naresh Mhaske VictorySarkarnama

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी अखेर विद्यमान खासदार राजन विचारे यांचा दारुण पराभव केला आहे. दीड लाखांपेक्षा अधिकची मते म्हस्के यांना मिळाली आहेत. या मताधिक्यात सर्वांत मोठा वाटा हा नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचा राहिला आहे. सलग दोनवेळा खासदार असणाऱ्या विचारें विरोधातील लढाई म्हस्केंसाठी तितकी राहिली सोपी नव्हती. नवी मुंबईतील शिंदे गटाच्या नेते आणि भाजप आमदारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे नरेश म्हस्केंना विजयाचे तोंड पाहता आले.

नवी मुंबईत विधानसभेच्या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार असताना देखील ही जागा शिंदे गटात गेल्यामुळे नाईक समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही नाराजी दूर करण्यात अली तरी नाईक समर्थकांनी सुरुवातीला प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. त्यामुळे ऐरोलीतून शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पाटकर, तुर्भेतील माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी  या नेत्यांनी प्रचारात मुसंडी मारली. 

त्याला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या जनसंपर्काचा म्हस्केंना चांगला फायदा झाला. म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. रॅली, कॉर्नर सभा, जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून ५० टक्क्यांपेक्षा अधिकच्या मतदान झाले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी  देखील वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भल्या पहाटे जाऊन शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांची भेट घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील बाणा जागवला, तसेच काही जुन्या शिवसैनिकांनाही धर्मवीर आनंद दिघेंची भावनिक साद घातल्याने  निकालात म्हस्के ची बाजू उजवी ठरली.

मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदारसंघ


पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यनेतृत्वावर पुन्हा एकदा नवी मुंबईच्या जनतेने विश्‍वास ठेवून कौल दिला आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे निवडून आल्यामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.  

Eknath Shinde on Naresh Mhaske Victory
Bhaskar Bhagare News : भास्कर भगरेंच्या मताधिक्यावर घाला घालणारे  "बंडुराव" कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com