Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; कोणाचे बारा वाजणार?

Thane Congress ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु मागील काही वर्षात ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे प्रखरतेने दिसत आहे
Rahul Gandhi, Eknath Shinde
Rahul Gandhi, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Thane Congress News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्र आली आहे. येत्या 12 मार्च रोजी यात्रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडकणार आहे. यासाठी काँग्रेसने जोरदार तयार करून त्याचे नियोजन देखील आखले जात आहे. राहुल गांधी हे यानिमित्ताने पहिल्यांदा ठाण्यात येत असून येत्या 12 तारखेला दाखल होणाऱ्या यात्रेने नेमके कोणाचे बारा वाजणार हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्यात ही यात्रा पुन्हा जोमाने सुरु झाली आहे.त्यानुसार आता ठाण्यात राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १२ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली.

अशी आहे जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था...

ठाणे जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत. परंतु मागील काही वर्षात ठाण्यासह जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे प्रखरतेने दिसत आहे. त्यातच ठाणे महापालिकेत देखील काँग्रेसचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच म्हणजे अवघे तीन नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे.

Rahul Gandhi, Eknath Shinde
Rahul Gandhi 0n MSP : '...तर आम्ही एक मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही;' 'MSP'बाबत राहुल गांधींचं विधान!

राजीव गांधीनंतर राहुल गांधी येणार ठाण्यात...

या यात्रेनिमित्त राहुल गांधी ठाण्यात येणार आहेत. तर, यापूर्वी गांधी घराण्यातील इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनी देखील आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेला नाही.

राहुल गांधी हे न्यायालयीन केस प्रकरणी भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु ठाण्यात ते प्रथमच येत आहेत. त्यामुळे याची उत्सुकता देखील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्या निमित्ताने ठाणे काँग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi, Eknath Shinde
Thane Politics : आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना सुनावले; ज्या शिवसेनेला विरोध केलात आता त्यांचेच...

या मार्गे जाणार यात्रा ...

ठाण्यात जेंव्हा यात्रा येणार आहे. त्यावेळी ती यात्रा प्रामुख्याने कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागातून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Edited By : Umesh Bambare

Rahul Gandhi, Eknath Shinde
Congress News : हायकमांड कधीच 5 स्टार हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत! काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com