Thane Politics: चक्क अपक्ष उमेदवारासाठी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराची माघार! आता होणार तगडी फाईट

Thane Municipal Election : ठाणे महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलली असून त्यांच्या विजयाची शक्यता बळावली आहे.
Independent candidate Pramila Keni meets NCP Sharad Pawar leaders after the party withdraws its official nominee, extending support in Thane Municipal Corporation election.
Independent candidate Pramila Keni meets NCP Sharad Pawar leaders after the party withdraws its official nominee, extending support in Thane Municipal Corporation election.Sarkarnama
Published on
Updated on

ठाणे पालिकेच्या 2017 मध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांना शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी नाकारली. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या दिवशी केणी या अर्ज माघारीसाठी गेल्या असता, त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपा गवंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून प्रमिला केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.

कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुकुंद केणी आणि प्रमिला केणी हे दोघेही निवडून आले होते. विकासकामांच्या जोरावरच मतदारांनी त्यांना कौल दिला होता. अशातच राजकारणात होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमिला केणी आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

पालिका निवडणुकीत केणी कुटुंबाला किमान दोन तिकिटे मिळतील अशी अशा होती. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी दोघांपैकी एकालाच तिकीट देण्यात येईल असे स्पष्ट केले. तर, त्यांच्या जागी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना शिंदे पक्षात आलेले सहकारी मिलिंद पाटील, त्यांची पत्नी मनाली पाटील आणि अन्य सहकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Independent candidate Pramila Keni meets NCP Sharad Pawar leaders after the party withdraws its official nominee, extending support in Thane Municipal Corporation election.
Eknath Shinde Shivsena : शिवसेनेला हादरा! उमेदवारी नाकारताच माजी नगरसेवकाने ५० वर्षांचा हिशोबच काढला; म्हणाला...

त्यामुळे महिलांची जागा म्हणून मनाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे प्रमिला केणी यांना तिकीट देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अशातच अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी केणी या अर्ज माघार घेण्यासाठी गेल्या असता, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केणी यांची भेट घेतली, अर्ज माघार न घेण्यास सांगितले.

दरम्यान, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने (NCP-SP) त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला. केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा देत, पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर केले व त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेवक मुकुंद केणी यांनी कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी काम केले. मात्र त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अशावेळी त्यांचे सहकारी असलेल्या मिलिंद पाटील यांनी त्यांच्या बाजूने उभे राहण्याची वेळ असताना, केवळ स्वतःसाठी आणि पत्नींसाठीच तिकीट निश्चित केल्याचा आरोप होत असून, यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरली आहे.

Independent candidate Pramila Keni meets NCP Sharad Pawar leaders after the party withdraws its official nominee, extending support in Thane Municipal Corporation election.
Thane MNS Protest : ठाण्यात मनसेच्या उमेदवारांचे अर्ज बाद, अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; निवडणूक अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढणार!

दरम्यान, प्रमिला केणी यांचे पुत्र मंदार केणी हे शिवसेनेतर्फे (Shivsena) 23 मधून निवडणूक लढवत आहेत. तर प्रमिला केणी अपक्ष शरद पवार गटाच्या पाठिंब्याने रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 23 ‘ब’ मधून प्रमिला केणी, तर प्रभाग क्रमांक 23 ‘ड’ मधून मंदार केणी निवडणूक लढवत आहेत. आई-मुलगा आमने-सामने आल्याने हा सामना केवळ राजकीयच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्यता असून, ठाणे महापालिका निवडणुकीतील ही लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com