Aaditya Thackeray  Sarkarnama
ठाणे

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; म्हणाले, 'मीही आजोबांसारखे...'

Inauguration of Shiv Sena branch at Jijamatanagar during Thane visit : इलाका भी हमारा है..! और धमाका भी हमारा होगा..! असे बोलून शिंदे गटाला डिचवलं.

Pankaj Rodekar

Thane News : भाजप आणि शिंदे यांच्यावर टीका करताना मला शिव्या देण्याची सवय नाही. पण मला आता वाटते, मीही आजोबांसारखे बोलायला पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या रक्तातही बाळासाहेब आहेत हे मात्र विसरू नका, असा ठाकरी भाषेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला. या वेळी त्यांनी इलाका भी हमारा है ..! और धमाका भी हमारा होगा..! असे बोलून शिंदे गटाला डिवचलं. शिवाय यापुढे बोलताना आपणच जिंकणार म्हणजे जिंकणार तसेच महाराष्ट्रही आपलाच असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे रविवारी ठाणे दौऱ्यावर होते. दौऱ्याचा शेवट जिजामातानगर येथे नव्याने उभारलेल्या शाखेच्या शुभारंभाने झाला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा शाखेच्या ठिकाणी आला तेथे त्यांची सभा पार पडली. शाखेच्या शुभारंभानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता जाहीर सभेला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, शिंदे हे चिंधी चोर आहेत, त्यांचे सरकार म्हणजे गुंंडांचे सरकार आहे. या वेळी त्यांनी त्यांच्या रडगाण्याचा पाढा वाचला. शिवाय त्यांना निवडणूक लढण्याबरोबर उद्योगाविषयी चर्चेचे चॅलेंज केले. अवघ्या 20 मिनिटे चाललेल्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

दरम्यान, पेपर फोडणाऱ्यांवर चर्चा करून एक कायदा करावा. यापुढे पेपर फोडणाऱ्याला दहा वर्षे शिक्षेचा कायदा करावा, असे त्यांनी म्हटले. याशिवाय बलात्कार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' आमदारावर आमचे सरकार आल्यावर दहशतवादाचा गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

शिंदे गटाला डिवचलं...

माघी गणेशोत्सवाच्या ठिकाणी स्पीकर लावण्यात आला होता. सभा सुरू झाल्यावर मंडळाकडून आवाज वाढविण्यात आला होता. त्यामुळे आवाजाची स्पर्धा पाहण्यास मिळाली. याचदरम्यान आदित्य ठाकरे यांनी इलाका भी हमारा होगा... और धमाका भी हमारा होगा... असा फिल्मी डायलॉग मारून शिंदे गटाला डिवचलं.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT