Devendra Fadanvis, Eknath Shinde, Rajendra Gavit sarkarnama
ठाणे

Palghar Loksabha News : एकनाथ शिंदेंचा खासदार ‘कमळा’वर लढणार? भाजप प्रवेशाचीही चर्चा...

Rajendra Gavit खासदार राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे असून, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ते खासदार झाले होते.

Umesh Bambare-Patil

Palghar Loksabha News : पालघर लोकसभा मतदारसंघात वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. येथे शिंदे गट शिवसेनेचा विद्यमान खासदार असून, आता यावेळेस हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपला गेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे खासदार राजेंद्र गावित हे या मतदारसंघातून यावेळेस कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेशा होण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

यावेळेस लोकसभा निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत धुसफूस संपलेली नाही. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या जागेवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. अशावेळी राजकीय सोय म्हणून काही मतदारसंघात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. असाच निर्णय पालघर लोकसभा मतदारसंघात झाला आहे. या मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत.

हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेलेला असल्याने अंतर्गत ॲडजेस्टमेंट म्हणून आता गावित हे कमळावर ही निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. कदाचित ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. खासदार राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे असून, मागील २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ते खासदार झाले होते.

त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून ते घरवापसी करणार असल्याचीही चर्चा आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर लढल्यास भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढणारे ते पहिले शिवसेना खासदार ठरतील. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गावित हे सलग दोन टर्म खासदार आहेत. त्यामुळे यावेळेस ते पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

या मतदारसंघातील शिवसेनेचे तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांचे २०१८ मध्ये निधन झाले. त्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा Chintaman Vanga यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा शिवसेनेच्या तिकिटावर उतरले होते. परंतु त्यांच्याविरोधात भाजपने राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवलं. त्यानंतर गावित खासदारपदी निवडून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपची पुन्हा युती झाली. राजेंद्र गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय झाला. परंतु युतीतील पारंपरिक जागावाटपानुसार पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे राजकीय सोय म्हणून गावितांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महायुतीचे उमेदवार गावित विजयी झाले. आता यावेळेस पुन्हा गावित स्वगृही जाण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT