Pratap Sarnaik, Narendra Modi sarkarnama
ठाणे

Thane Loksabha news : ठाण्याच्या मेळाव्यात अवतरले नरेंद्र मोदी; सभागृहात एकच जल्लोष, पण...

Pratap Sarnaik घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा पार पडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

सरकारनामा ब्यूरो

Thane News : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी युतीच्या नेत्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. शुक्रवारी ठाण्यात पार पडलेल्या युतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहावर आवर घालावा लागला.

ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरात मेळावा पार पडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा पार पडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर घालावा लागल्याचे चित्र दिसून आले. या मेळाव्यात विकास यांनी मोदी यांच्या शैलीत भाषण केले.

मोदींच्या नावाने लढवणार निवडणूक....

ठाणे महायुतीचा गड आहे, आधीपेक्षा मोठ्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. एक चेहरा समोर आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा आणि तोच महत्त्वाचा आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेतला नसला तरी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी काम करणार असल्याचे सरनाईक म्हणालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाव्य उमेदवार म्हणून यादी मोठी आहे, पण जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. महायुतीचा उमेदवार येत्या गुढीपाडव्यापर्यंत जाहीर होईल, अशी माझी खात्री आहे, गुढीपाडव्याला महायुतीच्या नावाने उमेदवार गुढी उभारणार असल्याचं सरनाईक म्हणालेत.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT