Thane news : राजकीय नेत्यांकडून भाषण करताना अनेकदा बोलण्याच्या नादात वादग्रस्त विधाने कळत नकळत केली जातात, तर कधी नेत्यांची पदंही चुकवली जातात, असंच काहीसं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांचं झालं. विभागीय मेळाव्यात राजन विचारे हे निष्ठावंत आणि चारित्र्यवान म्हणण्याऐवजी त्यांच्या तोंडून ‘चारित्र्यहीन’ असा शब्द गेला. त्यामुळे याची सध्या राजकीय वर्तुळाला चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडियावर देसाई ट्रोल होताना दिसत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यातच महाविकास आघाडीने ठाणे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला. मात्र, महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास विलंब होताना दिसत आहे. महाविकास आघाडीने उमेदवाराचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीने उमेदवारशिवाय मेळावे घेण्यास प्रारंभ केला आहे.
महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. या वेळी उमेदवार विचारे हे उपस्थित नव्हते. याप्रसंगी बोलताना, देसाई यांनी बोलताना, मी उमेदवार राजन विचारे आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहे. माझ्या शरदचंद्र पवार यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली असल्याचे सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी माझ्या निष्ठेने मला ही जबाबदारी दिली आहे. तसेच इंडिया आघाडीने जो नेता उमेदवार म्हणून दिला आहे. तो निष्ठावान आणि चारित्र्यहीन असल्याचा शब्द त्यांच्या तोंडून गेला. याचदरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी ‘चारित्र्यहीन’ नाहीतर ‘चारित्र्यवान’ असे म्हणून देसाईंना त्यांची चूक तत्काळ दाखवून दिली. मात्र, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देसाई हे आता चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.