Jagdish Shettar-Siddaramaiah- D. K. Shivakumar Sarkarnama
देश

Karnataka Politics : ‘आमदारकी, सन्मान देऊनही माजी मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला’

Jagdish Shettar : गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Vijaykumar Dudhale

Bangalore News : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना काँग्रेस पक्षाने सन्मानेच वागवले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विधान परिषदेचे आमदार केले. पण, ज्या भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून अपमानित केले, त्याच पक्षात त्यांनी प्रवेश केला. शेट्टर यांनी आमचा विश्वासघात केला, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. (Jagdish Shettar betrayed us despite giving MLA, honour : Congress)

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी (ता. 25 जानेवारी) काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कर्नाटकातील राजकारण तापले आहे. काँग्रेसकडून शेट्टर यांना भाजपमध्ये झालेला अपमान आणि काँग्रेसने दिलेली सन्मानाची वागणूक याची आठवण करून देण्यात येत आहे. शेट्टर यांनी आमचा विश्वासघात केल्याची टीका दोन्ही नेत्यांनी केली आहे. (Karnataka Politics )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकिटही दिले होते. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पराभवानंतरही काँग्रेसने त्यांना तातडीने विधान परिषदेची आमदारकी दिली होती. त्यानंतरही शेट्टर यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे.

शेट्टर यांना काँग्रेसने आदाराने वागवले आहे. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून अपमानित केले होते. त्यानंतरही शेट्टर यांनी पुन्हा भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला भाजपकडून पुन्हा पक्षात येण्यासंदर्भात विनंती केली जात आहे. काही कार्यकर्त्यांना मला भेटायला पाठवले जात आहे, असे त्यांनी मला सांगितले होते. मी भाजपत जाणार नाही, कारण काँग्रेसने माझ्या राजकीय जीवनाला नवसंजीवनी दिली आहे, असे शेट्टर यांनी मला सांगितले होते.

काँग्रेसने शेट्टर यांना कायम आदराची वागणूक दिली. त्यांनी भाजपच्या विरोधात अनेक विधाने केली हेाती, त्यामुळे शेट्टर यांच्यावर काँग्रेसने विश्वास ठेवला होता. पण, शेट्टर यांनी आमचा विश्वासघात केला आहे. ते कोणाच्या दबावाखाली गेले आहेत, हे मला माहीत नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी आमदार केले होते. पण भाजपने त्यांना कोणते आमीष दाखवले यांची काही माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘शेट्टर यांना काँग्रेसने कायम आदराने वागवले. भाजपने माझा अपमान केला. उमेदवारी न दिल्याने मी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही, असे ते वारंवार सांगायचे. त्यांच्यावर काँग्रेसकडून कोणताही अन्याय अथवा अपमान झालेला नाही. आम्ही त्यांच्याशी आदराने वागलो.

'कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे भाजपत परतलो'

दरम्यान, मी भारतीय जनता पक्षात म्हणजे स्वगृही परत यावे, अशी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यांनी टाकलेल्या दबामुळेच मी भाजपत प्रवेश केला आहे, असे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT