Emergency crews rush to the site where an Air India aircraft crashed into a medical college hostel, prompting nationwide shock and rescue efforts.  Sarkarnama
देश

Air India flight crash : एअर इंडियाचे विमान अचानक कसे कोसळले? तज्ज्ञांनी सांगितले नेमके कारण...

Ahmedabad India Plane Crash : बोईंग 787 विमान गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. लंडनला जात असताना उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.

सरकारनामा ब्युरो

Ahmedabad News : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानातून 242 प्रवासी करीत होते. अहमदाबादच्या मेघानी भागात ही विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटात कोसळले. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास बोईंग 787 विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते. लंडनला जात असताना उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.

विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळात खाली आले. या विमान अपघाताचा शोध घेतला जात आहे. त्यातच हा अपघात नेमका कोणत्या तांत्रिक कारणामुळे किंवा अन्य अडचणीमुळे झाला, हे स्पष्ट झाले नाही. त्यातच तज्ज्ञांनी या विमान अपघाताबाबत काही अंदाज व्यक्त केले आहेत.

लंडनला जाण्यासाठी हवेत झेप घेतलेले हे विमान जवळपास 825 फूट उंचीवर होते. एअर इंडियाच्या या विमानात पुरेसे इंधन भरलेले होते. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या विमानाने हवेत झेप घेतली. मात्र, विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच लगेचच खाली आले. यावेळी वैमानिकांनी विमान वर नेण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले. त्यांनी Mayday call दिला आणि त्यानंतर काही क्षणांतच विमान खाली कोसळले.

विमान क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या संजय लजार यांनी या अपघाताविषयी माहिती देताना सांगितले की, याची अनेक कारणं असू शकतात. विमान हवेत असताना पक्ष्यांची धडक किंवा टेक-ऑफची चुकीची पद्धत, हेही यामागचे कारण असू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

तज्ज्ञांच्या मते, विमानाच्या इंजिनने thrust (शक्ती) देणे बंद केले होते. त्याचबरोबर विमानाचे लँडिंग गेअर्स पण खालीच होते. याचा अर्थ, चाके आत घेतली गेलेली नव्हती. सध्या अपघाताचे कोणतंही एक कारण सांगणं घाईचे ठरणार आहे. पण या अपघाताविषयी या तज्ज्ञांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत.

दरम्यान, या विमानाच्या अपघातानंतर प्रशासनांने तातडीने पावले उचलली व मदतकार्य सुरु केले. एअर इंडिया आणि विमानतळ प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर या अपघाताचे नेमके कारण समजणार आहे.

दरम्यान, एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "एअर इंडियाचे विमान AI 171, जे अहमदाबादहून लंडनला जात होते, त्याला आज एक अपघात झाला आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांच्या कुटुंबियांबद्दल आणि प्रियजनांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. कंपनी सध्या अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी असलेल्या बचाव पथकाला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत," अशी माहिती चंद्रशेखरन यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT