Arvind Kejriwal Sarkarnama
देश

AAP News : 'आप'ला धक्क्यावर धक्के, एकाच वेळी 43 जणांनी दिला राजीनामा...

Amol Sutar

AAP News : दिल्ली आणि पंजाबनंतर तिसरा सर्वात मोठा पाठिंबा असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (आप) धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. आमदार भूपत भयानी यांच्या राजीनाम्यानंतर आता भरूचमधील 40 हून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आम आदमी पक्ष सोडला आहे. या सर्वांनी मिळून आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत.

गुजरात (Gujrat) आपचे प्रमुख इसुदान गढवी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमजद खान पठाण यांना लिहिलेल्या अधिकृत पत्रात, पक्षाचे 33 कार्यकर्ते आणि 10 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा जाहीर केला. विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपत भयानी यांनी एक दिवसापूर्वी राजीनामा दिला असतानाच या नेत्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पक्ष सोडला आहे.

दरम्यान, सामूहिक राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे (AAP) भरूचमधील जिल्हाध्यक्ष पीयूष पटेल म्हणाले की, राजीनामा देणारे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपासून पक्षात निष्क्रिय होते. यामुळे त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले नाही. राजीनाम्यासाठी पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचेही पटेल म्हणाले.

ही बाब राज्य नेतृत्वासमोर ठेवली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 5 उमेदवार विजयी होऊन आमदार झाले होते. पक्षाला सुमारे 13 टक्के मते मिळाली होती. दिल्ली आणि पंजाबनंतर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला फक्त गुजरातमध्ये सर्वाधिक मते मिळाली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळेच येथील लोकसभा (Loksabha) निवडणुकीतही पक्षाला मोठ्या आशा आहेत. गेल्या वर्षभरात एका आमदारासह अनेक नगरसेवक आणि इतर अधिकाऱ्यांनी आप सोडून भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT