BJP President Election : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. भाजप पक्षाच्या घटनेनुसार, 50 टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून आल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करता येते. भाजपकडे 37 मान्यताप्राप्त राज्य युनिट आहेत. यापैकी 26 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. जुलैच्या पहिल्या दोन दिवसांत भाजपने 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली. त्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच भाजप नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत असून कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भाजपच्या (BJP) संघटनात्मक निवडणुका पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच आगामी काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजप पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष पदावर संधी देऊ शकतो, अशी चर्चा सुरु असतानाच आता ही चर्चा काहीशी मागे पडली असून भाजपकडून नव्या अध्यक्षपदासाठी 6 नावांवर विचार सुरु आहे. या नावांवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरु असल्याची माहिती पक्षातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली.
अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील 'हे' नाव चर्चेत
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सहा नावांवर विचार करत आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्रसिंह यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांची नावे शर्यतीत आहेत.
26 राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष निवडले
भाजप पक्षाच्या घटनेनुसार, 50 टक्के राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडून आल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करता येते. सध्या भाजपकडे 37 मान्यताप्राप्त राज्य युनिट आहेत. यापैकी 26 राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. जुलैच्या पहिल्या दोन दिवसांत भाजपने 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला 9 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली. त्यामध्ये हिमाचल प्रदेश , उत्तराखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दमण दीव आणि लडाख या नऊ राज्यांचा समावेश आहे.
निवडीवेळी समतोल राखण्याचा प्रयत्न
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच निवड करताना समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक संतुलन, जातीय समीकरण. लवकरच राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी एक केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली जाऊ शकते. निवडणुकांची आवश्यकता असल्यास, ही समिती नामांकन, छाननी आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
नव्या अध्यक्षाच्या कारकीर्दीत होणार दहा राज्यातील निवडणुका
पक्षाच्या घटनेनुसार, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ 3 वर्षांचा आहे. त्यासोबतच एकाद्या व्यक्तीला दोन वेळपेक्षा जास्त वेळा पक्षाचा अध्यक्ष होता येत नाही. आता पक्षाच्या नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळात 12 महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये या वर्षी ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणूक होत आहेत तर त्यानंतर 2026 साली आसम, पश्चिम बंगाल, तमिलनाडु, केरळ, पुडुचेरी या राज्यांमध्ये तर 2027 साली उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.