Jairam Ramesh, Ghulam Nabi Azad Sarkarnama
देश

Ghulam Nabi Azad : 'आझाद' मधून काँग्रेस नेत्यांची पोलखोल ; जयराम रमेश यांच्यावर गंभीर आरोप.. ; कलम ३७० बाबत..

Ghulam Nabi Azad allegations Jairam Ramesh : जयराम रमेश त्यावेळी निघून गेले..

सरकारनामा ब्यूरो

Ghulam Nabi Azad allegations against Jairam Ramesh : माजी केंद्रीय मंत्री, डेमोक्रैटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी आपल्या 'आझाद'या आत्मचरित्रामधील अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे.

गुलाम नबी आझाद यांनी कलम ३७० ला विरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची भूमिकेवर घणाघात केला आहे. कलम ३७० वर संसदेत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरुन आझाद यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची पोलखोल केली आहे.

त्यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. काँग्रेसचे नेते. माजी खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

"ससंदेत जेव्हा कलम ३७० वर चर्चा सुरु होती, काँग्रेस त्याला विरोध करीत होती, तेव्हा जयराम रमेश हे सभागृहातून निघून गेले," असा गंभीर आरोप आझाद यांनी केला आहे.

काँग्रेसच्या नेत्या, माजी प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजकारणाबाबत निर्माण होणारी आवड आणि अन्य विविध मुद्दांवर मोठे गौप्यस्फोट आत्मचरित्रात केले आहेत. यामुळे पक्षांच्या अंतर्गत वाद यानिमित्ताने चव्हाट्यावर येणार आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुपासून सोनिया गांधी यांच्या प्रभारी अध्यक्षापदापर्यंत विविध घडामोडींवर आत्मचरित्रात भाष्य केल्याचे आझाद यांनी एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत सांगितले.

२०१९ मध्ये मोदी सरकारने सभागृहाच जम्मू-काश्मीर येथील कलम ३७० रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा जयराम रमेश यांच्या भूमिकेवर आझाद यांनी जोरदार निशाणा साधला आहे. या विषयावर काँग्रेसच्या ज्या पाच खासदारांनी विरोध केला होता, ते जी-२३ मधील होते. यात आझाद यांच्यासह, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशि थरूर यांचा समावेश होता.

काँग्रेसमधील सर्वात खराब अध्यक्ष कोण?

या आत्मचरित्रात त्यांनी काँग्रेसबाबतच्या अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुक केले आहे. तर वादग्रस्त मुद्यांवरही गुलाम नबी आझाद यांनी ताशेरे ओढले आहेत. 'काँग्रेसमधील सर्वात खराब अध्यक्ष कोण? यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं आहे. इंदिरा गांधीपासून ते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आझाद यांनी काम केले आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या चांगल्या आणि वाईट अनुभवाबाबात भाष्य करण्याचा त्यांना अधिकार आहे.

नरसिंहरावच जबाबदार

राहुल गांधी यांनी काम करण्याची पद्धतीवर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्या मते पीव्ही नरसिंहराव हे चांगले पंतप्रधानमंत्री जरुर होते, पण १९९६च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नरसिंहरावच जबाबदार असल्याचा आरोप आझाद यांनी आत्मचरित्रात केला आहे.

पक्षासाठी ते चांगले अध्यक्ष नाहीत...

गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की १९९६ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यांची चर्चा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत झाली. तेव्हा पक्षाचे नेतृत्व हे पीव्ही नरसिंहराव करीत होते. त्यावेळी आझाद यांनी नरसिंहराव यांच्यासमोरच सांगितले होते की ते चांगले पंतप्रधान आहेत, पण पक्षासाठी ते चांगले अध्यक्ष नाहीत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT