Narendra modi  Sarkarnama
देश

Parliament Security Breach: "संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर नरेंद्र मोदी पळ काढतायेत"

Narendra modi : घुसखोरी प्रकरणात चर्चा नाही तर चौकशीची गरज...

सरकारनामा ब्यूरो

Parliament Security Breach:संसदेत घुसखोरीवरुन विरोधीपक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)यांना लक्ष्य केले जात आहे. मोदींनी या प्रकरणी संसेदत चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या घुसखोरी प्रकरणात चर्चा नाही तर चौकशीची गरज आहे, असे म्हणत संसदेत या प्रकरणी चर्चेला थेट नकारच दिला. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh)यांनी 'एक्स'वरून (पुर्वीचे ट्वविटर) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधाला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इंडिया आघाडीकडून सर्वच विरोधीपक्षांकडून संसदघुसखोरी प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.गृहमंत्र्यांनी या प्रकरणी संसदेत निवेदन द्यावे, यासाठी सगळे पक्ष आग्रही आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरील चर्चेपासून पळ काढत आहेत" या शब्दांत जयराम रमेश यांनी मोदींवर टीका केली.

अगदी साध्या कारणासाठी पंतप्रधान चर्चेपासून पळत आहेत. १३ डिसेंबरला लोकसभेत घुसखोरांना प्रवेश देण्यासाठी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी पास देले होते. त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातील, असे जयराम रमेश म्हणाले. घुसखोरी करणारे तरुण हे सामान्य कुटुंबातील असून बेरोजगारीच्या मुद्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या भुमिकेवर नाराजी

संसेदत घुसखोरी होत असले तर त्याच्यावर संसदेत चर्चा होणे अपेक्षित आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी विरोधीपक्षांची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी कुठलीही चर्चा होणार नसल्याचे संकेत दिले. चर्चा नव्हे तर चौकशीची गरज असल्याचे मोदींनी म्हटले.त्यामुळे पंतप्रधानांच्या या भुमिकेवर विरोधीपक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

घुसखोरीमध्ये कुठली संघटना सहभागी

संसदेत घुसखोरी प्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करणाऱ्यांना विशेष न्यायालयासमोर देखील उपस्थित करण्यात आले. बेरोजगारीच्या मुद्याकडे लक्ष्य वेधण्यासाठी आपण घुसखोरी केल्याचे अटक केलेल आरोपी सांगत आहेत. मात्र, या प्रकरणात कोणत्या संघटनेचा हात आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT