Haryana BJP and JJP News Sarakarnama
देश

BJP Vs Dushyant Chautala : हरियाणात दुष्यंत चौटालांना मोठा झटका; तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश!

Haryana BJP and JJP News : हरियाणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिंद येथे मोठ्या जन आशीर्वाद रॅलीचे आयोजन केले होते.

Mayur Ratnaparkhe

Haryana BJP Politics News : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. या दरम्यान आता दुष्यंत चौटाला यांना मोठा झटका बसला आहे. रामकुमार गोतम, जोगीराम सिहाग आणि अनूप धानक जिंद या तिन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हरियाणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने(BJP ) जींद येथे मोठ्या जन आशीर्वाद रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि पक्षाचे प्रभारी विप्लव देव सहभागी झाले होते. या प्रसंगी रामकुमार गौतम, जोगीराम सिहाग, अनूप धानक आणि अंबालाच्या माजी महापौर राणी शर्मा यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

भाजप लवकरच राज्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. अशात आता या तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला(Dushyant Chautala) यांच्या जेजेपी पक्षाला मोठा झटका बसला आहे.

दुष्यंत चौटाला यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत मिळून, सरकार बनवले होते. मनोहरलाल खट्टर(Manoharlal Khattar) यांनी तेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. याचवर्षी भाजपने खट्टर यांच्या जागेवर नायबसिंह सैनी यांच्याकडे राज्याची सूत्रं सोपवली आणि जेजेपी सोबतची आघाडी संपुष्टात आणली.

निवडणूक आयोगाने बिश्नोई समाजाच्या परंपरागत सणांचे महत्त्व लक्षात घेत, शनिवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलून ५ ऑक्टोबर केली, जी आधी १ ऑक्टोबर ठरवली गेली होती. निवडणूक आयोगाने सांगितले की जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची मतमोजणी आता ४ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबर रोजी होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT