Jharkhand Political News : झारखंड मुक्ति मोर्चा(JMM) मधून बडतर्फ करण्यात आलेले लोबिन हेम्ब्रम यांनी माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या उपस्थितीत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोबिन हेम्ब्रम यांना या वर्षाच्या सुरुवातीस जेएमएम मधून सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले होते. हेम्ब्रम यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजपमध्ये लोबिन यांचे स्वागत करताना बाबूलाल मरांडी यांनी म्हटले की, झारखंड राज्य चळवळीचे प्रमुख नेते, माजी आमदार लोबिन हेम्ब्रज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे नेतृत्व आणि भाजपच्या धोरणांवर निष्ठ व्यक्त करत, भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. भाजप परिवारात मी तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे.
याप्रसंगी आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन(Champai Soren) देखील हजर होते. लोबिन यांना मे 2024 मध्ये जेएमएमने सहा वर्षांसाठी बडतर्फ केले होते. त्यांच्याविरोधात पक्षांतराचा गुन्हा दाखल केला गेला होता. याचसोबत त्यांची आमदारकीही गेली होती. ते झारखंडमधील आदिवासी चेहरा आहे.
यावर्षी जेएमएमचे तीन दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप(BJP)मध्ये सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिबू सोरेन यांच्या सूनबाई सीता सोरेन भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या. ज्यानंतर माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांन जेएमएमवर अपमानित केल्याचा आरोप करत, भाजपात प्रवेश केला आणि आता लोबेन हेम्ब्रम यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.