Shivakumar Government Faces First Major Setback News : डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील १३ मंत्र्यांनी बुधवारी शपथ घेतली होती. खाते वाटप होण्यापूर्वीच रामलिंगा रेड्डी यांनी शिवकुमार यांची भेट घेऊन बंगळूर शहर विकास खाते देण्याची मागणी केली होती. मात्र बंगळूर विकास खाते न मिळाल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मंत्री आर. रामलिंगा रेड्डी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा अधिकृत राजीनामा जाहीर केला. बंगळुरातील कोरमंगल येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा पत्र दाखवत आपल्या निर्णयाची घोषणा केली.
यानंतर आता शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात खातेवाटपाच्या मुद्द्यांवरून असंतोष उफाळून आला असून सरकार स्थापन होऊन अवघे तीन दिवस होताच पहिला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तर या राजीनाम्याने राज्यात खळबळ उडाली आहे. रेड्डी यांनी स्पष्ट केले की, ते केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देत असून काँग्रेस सोडणार नाहीत. मी आमदार आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पुढेही काम करत राहीन, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल मी आपला आणि काँग्रेसचा आभारी आहे; मात्र माझ्या अंतःकरणाच्या विरोधात काम करणे शक्य नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा.
बंगळूर विकास खात्यावरून नाराजी
शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील १३ मंत्र्यांनी बुधवारी शपथ घेतली होती. खाते वाटप होण्यापूर्वीच रामलिंगा रेड्डी यांनी शिवकुमार यांची भेट घेऊन बंगळूर शहर विकास खाते देण्याची मागणी केली होती. अन्यथा आपला राजीनामा स्वीकारावा, असेही त्यांनी सांगितले होते. त्यांना जलसंपदा खाते दिले. यामुळे ते नाराज झाले. पत्रकार परिषदेतच त्यांनी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी करून ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे जाहीर केले.
राजीनामा पत्र मुख्यमंत्री कार्यालयात दाखल
रामलिंगा रेड्डी यांचे निकटवर्तीय मावळी सत्या यांनी विधानसौध येथे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तुषार गिरीनाथ यांच्याकडे राजीनामा पत्र सुपुर्द केले.
हरिप्रसाद यांची समेटाची भूमिका
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी रेड्डी यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. रेड्डी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाला हानी पोहोचवणारे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करून सर्व गैरसमज दूर केले जातील, असे हरिप्रसाद म्हणाले.
‘कधीही लॉबिंग केले नाही’
रेड्डी म्हणाले, ‘‘१९७३ मध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांमध्ये काम केले. त्यानंतर आमदार झालो आणि माजी मुख्यमंत्री एम. वीराप्पा मोईली यांनी मला प्रथम मंत्री केले. आतापर्यंत सहा वेळा मंत्री म्हणून काम केले आहे; मात्र कोणतेही विशिष्ट खाते मिळावे म्हणून मी कधीही लॉबिंग केले नाही.’’
नसल्यास राजीनामा घ्या
दरम्यान नाराज मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करा, मात्र ते तयार नसल्यास त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, असा स्पष्ट संदेश कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात खातेवाटपाच्या मुद्द्यांवरून असंतोष उफाळून आला असून सरकार स्थापन होऊन अवघे तीन दिवस होताच पहिला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
अपेक्षित खाते न मिळाल्याने नाराज झालेले वरिष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर के. एच. मुनियप्पा यांनीही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. खातेवाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचली आहे.
पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी या घडामोडींची माहिती राहुल गांधी यांना दिल्याचे समजते. दरम्यान, रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. शिवकुमार यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रेड्डी यांचा मोबाईल फोन बंद झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.