DK Shivakumar: कर्नाटकचं 'सीएम'पद खेचून आणलेले काँग्रेसचे 'संकटमोचक'च कधीकाळी आलेले अडचणीत; 52 दिवस जेलमध्ये होता मुक्काम

Congress Leader D.K.Shivakumar : भाजपला पराभवाचा झटका देत 2023 मध्ये सत्तेत आल्यापासून कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरुन सिद्धरामय्या विरुद्ध डी.के.शिवकुमार असा सुप्त संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेसनं या वादावर तोडगा काढताना अडीच- अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर आणला होता.
DK Shivakumar
DK ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News: सहा महिने मुख्यमंत्रीपदासाठी तटून राहिलेल्या डी.के.शिवकुमारांचं स्वप्नं आता लवकरच पूर्ण होत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा सिद्धरमैया यांनी राजीनामा दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण याच काँग्रेसच्या डॅशिंग नेत्याला अटक होऊन 2019 मध्ये तब्बल 52 दिवसांची जेलवारी करावी लागली होती.

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा डी.के.शिवकुमारांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री पदाचा मुद्दा तापवला होता. पण अखेर सहा महिन्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडला गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष संपवण्यात यश आलं आहे.

काँग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक अशी ओळख असलेले दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांना 3 सप्टेंबर 2019 ला मनीलाँड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडी(अंमलबजावणी संचालनालय)ने शिवकुमार यांना अटक केली होती.

भाजपला पराभवाचा झटका देत 2023 मध्ये सत्तेत आल्यापासून कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरुन सिद्धरामय्या विरुद्ध डी.के.शिवकुमार असा सुप्त संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेसनं या वादावर तोडगा काढताना अडीच- अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर आणला होता. याआधी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री पदावरुन पेटलेला दोन ज्येष्ठ नेत्यांमधील संघर्षाची वेळीच दखल न घेतल्यानं काँग्रेसला ही दोन्ही मोठी राज्ये गमवावी लागली होती. आता काँग्रेसनं ती चूक उशिरा का होईना सुधारली आहे.

DK Shivakumar
Karnataka CM news : नाश्ता करता करताच सिध्दरामय्यांनी नेत्यांसमोर टाकला बॉम्ब; थेट राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांनी पायच धरले...

कर्नाटकच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या डी.के. शिवकुमार यांची तिहार तुरुंगात जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी तुरुंगात झालेल्या सोनिया गांधी आणि शिवकुमार यांच्यातील काही मिनिटांच्या भेटीवेळी संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही दिली होती.

यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं शिवकुमार यांना तब्बल 52 दिवसांच्या कोठडीनंतर जामीन मंजूर झाला होता. त्यांना अटकेदरम्यान,तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. मनीलॉड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांना 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अटक करण्यात आल्यामुळे उलटसुलट चर्चांनी जोर धरला होता.

DK Shivakumar
MLC Election : जळगावसाठी भाजपचं 'नो कॉम्प्रमाईज'; विधानपरिषदेला एकनाथ शिंदेंच्या मुलुख मैदानी तोफेला घ्यावी लागणार माघार

दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना 25 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. यावेळी न्यायालयानं त्यांना जामिनावर सुटका झाल्यानंतर देशाबाहेर जाता येणार नाही, संबंधित प्रकरणाबाबतचे कोणतेही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे,साक्षीदारांवर दबाव टाकू नये, तपास संस्थांनी चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहावे यांसारख्या अटी घालत जामीन मंजूर केला होता.

काँग्रेसचे 'संकटमोचक'

काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना पक्षासाठी संकटमोचक मानले जाते. जेव्हा जेव्हा पक्षावर कोणत्याही प्रकारचे संकट आले, तेव्हा ते ढाल बनून उभे राहिले. राज्यात त्यांना काँग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणूनही ओळखले जाते. खरे तर, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेले जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार जेव्हा धोक्यात आल्यासारखे वाटायचे, तेव्हा डी. के. शिवकुमार आमदारांना शांत करण्यासाठी पुढे सरसावत असत. जेव्हा जेव्हा पक्षात बंडाचे आवाज उठायचे, तेव्हा डी. के. शिवकुमार बंडखोर आमदारांना शांत करतील याची खात्री करायचे. गेल्या वर्षी राज्यात तीन लोकसभा आणि दोन विधानसभा जागा जिंकून त्यांनी हे सिद्ध केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com