

Congress government : काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत १३ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये आजपासून शिवकुमार पर्व सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर शिवकुमार यांना संधी मिळाली आहे.
लोकभवनमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला सिध्दरामय्यांसह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. शिवकुमार यांनी शपथ घेत असतानाच राहुल गांधी यांना खूश केले आहे. शिवकुमार यांनी हातात संविधान घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
राहुल गांधी हे अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये हातात संविधान घेत भाषण करतात. संविधानाच्या मुद्द्यावरून ते सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. यापार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी हातात संविधान घेऊनच पदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या या कृती चर्चा होत आहे.
सिध्दरामय्या यांना दुसरं गिफ्ट
माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना आज पक्षाने दुसरं गिफ्ट दिलं. त्यांचे आमदारपुत्र यतिंद्र यांनीही आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंगळवारीच सिध्दरामय्या यांची पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेकाने मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना त्यांनी यतिंद्र यांना मंत्रिपदाची अट घातल्याची चर्चा होती.
दरम्यान, शिवकुमार यांच्या कॅबिनेटमध्ये जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री असतील. खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्यासह ७८ वर्षीय के. एच. मुनियप्पा, केजी जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्ण बायरेगौडा, यू. टी. खेदार, ईश्वर खांद्रे, बैराथी सुरेश आणि शरण प्रकार पाटील यांनाही मंत्रिमंडलात स्थान मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.