Maharashtra Lok Sabha Election Sarkarnama
देश

Maharashtra Election Update : बारामती, चंद्रपूर, नाशिक, अमरावती..! सट्टा बाजारात कुणाची चलती?

Rajanand More

Satta Bazar Prediction : सट्टा बाजारात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Update) निकालावर जोरदार बेटिंग सुरू आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 8 ते 9 लाख कोटी रुपयांपर्यंत बेटिंग पोहचले आहे. देशात पुन्हा 'एनडीए'ची (NDA) सत्ता येणार असल्याचा कल सट्टा बाजारात असला तरी महाराष्ट्रात मात्र एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही बाजारातून केला जात आहे.

मागील निवडणूक एनडीएला 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. यावेळी निवडणुकीआधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेले. त्यामुळे एनडीएने राज्यात यावेळी 45 पारचा नारा दिला. मात्र, हा आकडा तर दुरच एनडीएला 30 चा आकडाही ओलांडता येणार नाही असे दिसते. (Satta Bazar Latest News)

सट्टा बाजारातून तसे संकेत मिळत आहेत. राज्यात एनडीएला (NDA) केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा कल आहे. बारामतीसह महाराष्ट्रातील इतर काही मतदारसंघातील निकालावरही सट्टा बाजारात जोरदार बेटिंग सुरू आहे. मुंबईतील सट्टा बाजारातील हे चित्र असून 'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Betting Market News)

बारामतीत सुप्रिया सुळे

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. सट्टा बाजाराने सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कल दिला आहे. तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असे भाकित सट्टा बाजारात वर्तवले जात आहे. (Latest Political News)

नाशिकमध्ये गोडसे

नाशिकमध्ये यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकले आहेत. पण सट्टा बाजाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पसंती दिली आहे. तर नागपूरमध्ये नितीन गडकरी पुन्हा निवडून येतील, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.

अमरावतीत राणांचा पराभव

अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव होऊ शकते. या मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी होतील, असा कल सट्टा बाजारात आहे. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख निवडून येतील, अशी चर्चा बाजारात आहे. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती विजयी होतील, असे भाकित वर्तवले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT