Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी असून ते शेतीत रमले आहेत. येत चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकाला बाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे भाकीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए 400 पार करणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
'देशातील जनतेच्या मनात जे आहे ते होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असेल.', असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत. आज (गुरुवारी) त्यांच्या गावच्या देवस्थानची महापूजा असून या पूजेला ते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना म्हणाले, देशातल्या जनतेने ठरवलेले आहे की मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे. कारण हे सरकार गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे हित जपणारे आहेत. देशातील व राज्यातील सरकारने सर्वसामान्यांना मदतीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकांनी यावेळेस मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वेळच्या निकालात भाजपचा 400 पारचा नारा यशस्वी होईल. आमचे सरकार फिल्डवर जाऊन काम करणारे आहे. घरात बसून काम करणारे सरकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लागवला.
विश्रांतीसाठी आलेले मुख्यमंत्री आपल्या शेतीत रमले आहेत. शेतीची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सध्या आमच्याकडे शेतीमध्ये बांबू लागवड केली आहे. तसेच रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केलेली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या रेशीम शेतीतून सुमारे दहा शेतकऱ्यांना अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मी निसर्गात, शेतीत रमणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांविषयी आस्था आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.