Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Modi Government Breaking : मोदी सरकारची धाकधूक वाढली; संकटकाळात भाजपच्या मदतीला कायम धावून येणारा 'हा' पक्ष साथ सोडणार...

Deepak Kulkarni

New Delhi News : 'चारशे पार'चा नारा देत लोकसभा निवडणुकीला भाजप आणि एनडीए सामोरे गेली. पण निकाल विरोधात आला आणि भाजपची गाडी 240 तर एनडीए 294 जागांवरच अडकली. भाजपचं स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याचं स्वप्नं भंगलं अन् एनडीएच्या जोरावर सत्तास्थापन करण्याची वेळ भाजपवर आली. पण आधी दोन टर्म फूल बहुमतात काढलेल्या मोदी सरकारची तिसरी टर्म सत्वपरीक्षेची असणार असून धाकधूक कायम राहणार आहे.

मित्रपक्षांच्या भरवशावर सरकार चालवताना नरेंद्र मोदी - अमित शाह यांची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडी एनडीएतील 'अतृप्त' पक्षांच्या शोधात राहणार आहे. अशातच आता एनडीएच्या (NDA) गोटातून मोठी बातमी पुढे येत आहे. एनडीएमधील प्रमुख आणि 9 खासदार असलेल्या पक्षाने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या लोकसभेत वाढल्यामुळे आधीच काहीसा 'बॅकफूट'ला गेलेल्या मोदी सरकारला राज्यसभेतही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.कारण ओडिशातील नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या बिजू जनता दलाने (BJD) 'एनडीए'तून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यसभेत संकटकाळात बीजेडी हा पक्ष भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.अशा मित्रपक्षाने साथ सोडणे मोदी सरकारचं टेन्शन वाढवणारी ठरणार आहे.

ट्रिपल तलाक,सीएए आणि कलम 370 अशा मोठे निर्णय घेताना बीजेडीने मोदी सरकारला भरभक्कम पाठिंबा जाहीर केला होता. विरोधी पक्षांनी ज्या ज्यावेळी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणत कोंडी केली, तेव्हा बीजेडीने भाजपची ढाल बनली.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी करत बीजू जनता दलाच्या खासदार संसदेतून बाहेर पडले.सध्या त्यांचे राज्यसभेतल्या खासदारांची संख्याबळ हे 9 आहे. राज्यसभेत भाजपचं स्वबळावर बहुमत नाही. भाजपप्रणित एनडीएचे राज्यसभेत 114 खासदार आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला 123 खासदारांच्या पाठिंब्याची गरज असते. त्यामुळे आता भाजपची राज्यसभेत डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ट्रिपल तलाक,सीएए आणि कलम 370 अशा मोठे निर्णय घेताना बीजेडीने मोदी सरकारला भरभक्कम पाठिंबा जाहीर केला होता. विरोधी पक्षांनी ज्या ज्यावेळी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणत कोंडी केली, तेव्हा बीजेडीने भाजपची ढाल बनली.

लोकसभा निकालादिवशीच ओडिशा विधानसभा निवडणुकांचाही निकाल लागला होता.या निवडणुकीत भाजपने बिजू जनता दलाला मोठा दणका देत ओडिशाची सत्ताही हिरावून घेतली होती.त्यानंतर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी पक्षाचे नेते नवीन पटनायक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पटनायक यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारांसोबतच्या बैठकीत आता भाजपला पाठिंबा नाही,तर फक्त विरोध असा अजेंडाही बोलून दाखवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT