PM Modi Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेलबर्न दौऱ्यापूर्वी त्यांना ऑनलाइन धमकी मिळाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तपासही सुरु केला आहे. या तपासादरम्यान ज्या कॉम्प्युटरच्या आयपी अॅड्रेसवरुन ही धमकी आलेली आहे तो देखील पोलिसांनी शोधून काढला आहे.
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ९ जुलै रोजी नियोजित असलेल्या मेलबर्न दौऱ्याच्या काही दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या एका ऑनलाइन जीवे मारण्याच्या धमकीची ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस चौकशी करत आहेत. तपासकर्त्यांनी या सोशल मीडिया पोस्टशी संबंधित आयपी (IP) ॲड्रेस शोधून काढला आहे. 'द ऑस्ट्रेलिया टुडे'नं आपल्या वृत्तात म्हटलं की, "मेलबर्न मीट्स मोदी" (Melbourne Meets Modi) या कार्यक्रमाला PM मोदी हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी केलेल्या फेसबूक पोस्टखाली ही धमकी देण्यात आली होती. हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ९ जुलै रोजी मेलबर्नमधील मार्वल स्टेडियमवर होणार आहे.
ज्या फेसबूक अकाऊंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे त्यात म्हटलं की, "कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंद ठेवलेले बरे, अन्यथा मोदी ऑस्ट्रेलियात आपला मृत्यू ओढवून घेतील. ज्या दिवशी ही ऑनलाइन धमकी दिली गेली त्याचदिवशी हे प्रकरण ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडं तपासासाठी सोपवण्यात आलं. तपासाशी संबंधित सुत्रांच्या हवाल्यानं 'द ऑस्ट्रेलिया टुडे'नं म्हटलं की, अधिकाऱ्यांनी पोस्टशी संबंधित आयपी ॲड्रेस शोधून काढला असून त्याची पडताळणी करत आहेत. तसेच, या पोस्टकर्त्याकडून यापूर्वी काही गुन्हा घडला आहे का? याचीही तपासणी अधिकारी करत आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी या तपासाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, भेटीवर आलेल्या विविध देशांच्या प्रमुखांना मिळणाऱ्या धमक्यांची ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणांकडून अत्यंत गांभीर्यानं दखल घेतली जाते. अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय भेटींच्या सुरक्षा व्यवस्थेत सहसा अनेक यंत्रणांचा समावेश असतो. यामध्ये ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकं यांचा समावेश असतो.
पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या काही दिवस आधीच ही कथित धमकी समोर आली आहे. या दौऱ्यादरम्यान ते द्विपक्षीय चर्चांमध्ये तसंच मेलबर्नमधील जनसभेसह विविध सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.