Siya Goyal: सिया गोयल प्रकरणात ट्विस्ट! माध्यमांसमोर बोट दाखवल्याच्या वादावर कुटुंबियांचा मोठा खुलासा

Siya Goyal: केतन अगरवाल हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल हीनं दोन दिवसांपूर्वी कोर्टातून बाहेर पडत असताना माध्यमांसमोर आक्षेपार्ह इशारा केला असल्याचा आरोप केला जात होता. यामुळं सियाला टार्गेटही करण्यात आलं होतं.
Siya Goyal_Ketan Agarwal
Siya Goyal_Ketan Agarwal
Published on
Updated on

Siya Goyal: केतन अगरवाल हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल हीनं दोन दिवसांपूर्वी कोर्टातून बाहेर पडत असताना माध्यमांसमोर आक्षेपार्ह इशारा केला असल्याचा आरोप केला जात होता. यामुळं सियाला टार्गेटही करण्यात आलं होतं. पण आता यामध्ये नवा ट्विस्ट आला असून सियानं अश्लील कृत्य खरंच केलं होतं का? याचा खुलासा त्यांनी केला आहे.

Siya Goyal_Ketan Agarwal
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरीचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; CBIची पण होणार एन्ट्री? घोटाळ्याची पाळमुळं खोलवर

नेमका वाद काय?

केतन अगरवाल हत्येतील आरोपी सिया गोयल हिला पोलीस घेऊन जात असताना तिने कथितरीत्या 'मिडल फिंगर' (मधले बोट) दाखवल्याचे दृश्य समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, तिच्या कुटुंबीयांनी आता स्पष्टीकरण दिलं असून, माध्यमांचा किंवा जनतेचा अनादर करण्याच्या उद्देशाने तिनं ती कृती केली असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तिला वाहनातून नेत असताना ही घटना घडली. तिचे मधले बोट वाहनाच्या दरवाजाच्या फटीत अडकल्यानं तिला दुखापत झाली होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दुखापतीमुळंच तिनं ते बोट वर धरलं होतं; माध्यमांकडे पाहून जाणीवपूर्वक केलेली ती कोणतीही आक्षेपार्ह कृती नव्हती, असं त्यांनी सांगितलं.

Siya Goyal_Ketan Agarwal
Salil Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; नागपूरमध्ये मोठे संघटनात्मक बदल

"सियाबाबत आक्षेप घेताना ती आक्षेपार्ह पद्धतीने बोट दाखवत होती, असा दावा केला जात आहे. हे पूर्णपणे असत्य आहे. पोलीस तिला पडताळणीसाठी घरी घेऊन आले होते, तेव्हा तिची दोन बोटे वाहनाच्या दरवाजाच्या फटीत अडकली. तिच्या एका हातावर पट्टी बांधलेली आहे आणि एका बोटाला प्रचंड सूज आली आहे. तिची नखंही निळी पडली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचं ज्या प्रकारे चित्रण केलं जात आहे, ते पूर्णपणे चुकीचं आणि दुर्दैवी आहे," असं सियाच्या वडिलांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.

सिया गोयल यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनीही 'टाइम्स नाऊ'शी बोलताना सांगितलं की, त्या कृतीचा अर्थ अनादर असा काढणं हा केवळ एक तर्क आहे. सियाचा कोणताही आक्षेपार्ह कृती करण्याचा उद्देश नव्हता आणि ती केवळ दुखापत झालेले बोट वर धरून होती, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलीस कोठडीत नेलं जात असताना आरोपीच्या वर्तनावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि सोशल मीडियावर या दृश्यांवरून मोठी चर्चा व टीका झाली होती, त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com