Mamata Banerjee: ममता बॅनर्जींना सर्वोच्च झटका! तृणमूलच्या आणखी एका बड्या नेत्यानं सोडली साथ

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या पश्चिम बंगालच्या प्रदेश अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या पश्चिम बंगालच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं खरंतर ममतांसाठी हा सर्वोच्च झटका मानला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाचे २० खासदार, ६० आमदार आणि काही पदाधिकारी एकामागून एक ममता बॅनर्जी यांना सोडून गेले आहेत.

Mamata Banerjee
Siya Goyal: सिया गोयल प्रकरणात ट्विस्ट! माध्यमांसमोर बोट दाखवल्याच्या वादावर कुटुंबियांचा मोठा खुलासा

भट्टाचार्य यांनी पत्रात काय म्हटलं?

एकामागून एक सर्व आमदार-खासदार-प्रदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली तरी चंद्रिमा भट्टाचार्य मात्र ममतांसोबत कायम होत्या. यापूर्वीचे तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांच्या जागी ३ जून २०२६ रोजी चंद्रिमा भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण आपल्या राजीनाम्यात भट्टाचार्य म्हणतात, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आणि त्याच्याशी संबंधित विविध बँक खात्यांची अधिकृत हस्ताक्षरकर्त्या रुपातील आपली जबाबदारी माघारी घेत आहे. याशिवाय भारतीय निवडणूक आयोगासमोर ममता बॅनर्जी यांच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून हजेरी लावणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण पत्रात ममता बॅनर्जी यांच्याबद्दल सन्मान व्यक्त करताना भविष्यातही आपण त्यांचा सन्मान करत राहू असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

Mamata Banerjee
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरीचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; CBIची पण होणार एन्ट्री? घोटाळ्याची पाळमुळं खोलवर

कोण आहेत भट्टाचार्य?

पश्चिम बंगालमधील पूर्वीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये चंद्रिमा भट्टाचार्य यांनी अर्थ आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. पक्षाच्या महिला विंगच्या प्रमुख पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. राज्याच्या तीन वेळेच्या आमदार राहिलेल्या चंद्रिमा भट्टाचार्य यांचा २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत दमदम उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सौरव सिकदर यांनी पराभव केला होता. या जागेवर त्यांना ७६,८८० मतं मिळाले होते, तर भाजपच्या उमेदवाराला केवळ २६,४०४ मतांच्या फरकानं त्यांचा पराभव केला होता. चंद्रिमा यांची वैयक्तिक हार ही तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातील खराब कामगिरीचं प्रतिक बनली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com