Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Modi Government News: मोदींचं पुन्हा धक्कातंत्र,17 ऑगस्टला मोठी घोषणा? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Vice President Election 2025 : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सत्ताधारी एनडीएकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News :पुढच्या महिन्यात 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आता एनडीएच्या गोटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संसद भवनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेत्यांची नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या (NDA) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार यावरुन राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जोडगोळी पुन्हा धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून चर्चेतील चेहर्‍यांऐवजी नवाच उमेदवार पुढे आणण्याची शक्यता आहे.

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी रविवारी(ता.l7) अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे.काही दिवसांपूर्वी संसद भवनात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत मोठी माहिती दिली होती.आता रविवारी होत असलेल्या एनडीएच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

एनडीएच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी(Vice President Election) उमेदवाराचं नाव निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कदाचित एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार येत्या 21 ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या काळात निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय या पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार,राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची नावे देखील चर्चेत आहेत.

पण आता मोदी-शाह गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांनाही उपराष्ट्रपती पदासाठी भाजपाकडून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर संकेतानुसार ही निवडणूक 60 दिवसांच्या घेणे अपेक्षित आहे.

दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सत्ताधारी एनडीएकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे. भाजप स्वत:च्या पक्षातील नेत्याला संधी देणार की एनडीएतील घटक पक्षाच्या नेत्याला उपराष्ट्रपती करणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT