Vice President Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; NDA कडून पंतप्रधान मोदींसह नड्डांवर महत्वाची जबाबदारी

NDA Grants Decision-Making Power to Modi and Nadda : संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.
PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate. Sarkarnama
Published on
Updated on

Vice Presidential Candidate Selection Process : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील महिन्यांत निवडणूक होणार असून त्यासाठी सत्ताधाऱी एनडीएमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी खलबतं सुरू आहेत. याबाबत आज मोठी अपडेट समोर आली आहे.

एनडीएतील प्रमुख नेत्यांची गुरूवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित करण्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे दोन नेते एनडीएचा उमेदवार निश्चित करतील.

संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी त्यासाठी आपल्या आरोग्याचे कारण दिले होते. मात्र, विरोधकांनी यामागे वेगळेच राजकारण घडल्याचा दावा केला होता. तडकाफडकी राजीनामा दिल्यापासून धनखड हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेली नाहीत. तसेच त्यांनी मीडियाशीही संवाद साधलेला नाही.

PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
Rahul Gandhi News : अखेर राहुल गांधींनी घोळाचे पुरावे दिलेच; एका घरात 70 मतदार, महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीत मतदान…

दुसरीकडे एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी बैटकांचे सत्र सुरू झाले आहे. आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि नड्डा यांना उमेदवार निवडीचे सर्व अधिकार देण्यात आले. एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तरी एनडीएचा उमेदवार निवडून येण्यात कसलीही अडचण नाही. त्यामुळे मोदी आणि नड्डी उपराष्ट्रपतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार, याबाबत उत्सुकता आहे.

PM Narendra Modi and BJP President JP Nadda at an NDA meeting where they were entrusted with the responsibility of selecting the alliance's Vice President candidate.
Narendra Modi : मला मोठी किंमत चुकवावी लागेल, पण मी तयार! पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, 24 तासांत पलटवार

निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यताही आहे. पण त्याची शक्यता धूसर आहे. एनडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, यावर इंडिया आघाडीचा उमेदवार ठरणार आहे. विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका, आघाड्यांचे राजकारण, जातीय समीकरणे आदी मुद्दे विचारात घेऊन एनडीएकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com