Nitish Kumar, Prashant Kishor, Lalu Prasad Yadav Sarkarnama
देश

Prashant Kishor News : 'नितीशकुमार राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात..' ; प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, लालू यादवांवरही निशाणा!

Prashant Kishor on Nitishkumar and Lalu Yadav JDU and RJD : 'JDU' आणि 'RJD'वरही प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला!

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor on JDU and RJD : बिहारमध्ये 2025 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी जोर लावायला सुरुवात केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जनसुराज यात्रेच्या माध्यमातून ते सातत्याने बिहारच्या जनतेच्या जास्तीत जास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

या दरम्यान ते मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही नेत्यांनावर निशाणा साधला आहे.

प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी म्हटले की, बिहार देशातील आजारी राज्य नव्हते. बिहार देशातील टॉप 10 राज्यांपैकी एक होते. अनेकांचं म्हणणं आहे की की लालू प्रसाद यादव यांनी बिहारला बरबाद केलं. 1990मध्ये जेव्हा लालू प्रसाद यादव यांचं सरकारं आलं तेव्हा बिहार सर्वात मागास राज्य होतं, मग सरकार कुणाचंही आलं तरी बिहार हे कायमच मागास राज्य राहिलं.

प्रशांत किशोर म्हणाले कुणाला तुम्ही प्रस्थापित नेता संबोधत आहात. बिहारमध्ये सर्वात मोठे नेते लालू आणि नितीशकुमार आहेत. भाजपच्या नेत्याचं काही नावही नाही. मात्र लालू आणि नितीशकुमार यांना बिहारच्या जनतेने एक चतुर्थांशही मत दिले नाही. लालू यादव(Lalu Yadav) 1995 नंतर स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत. बिहारचे राजकारण विभागलेले आहे. नितीशकुमार आपल्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. ते उगवात सूर्य नाहीत. जदयूकडे जाती विशेष अशी कोणतीही मोठी व्होट बँक नाही.

तसेच प्रशांत किशोर म्हणाले नितीशकुमार(Nitishkumar ) आजही काहीच नाहीत. बारा जागा जिंकल्यावर जर तुम्हाला मजबुती वाटत असेल, तर तुम्ही नीट बघा. तुम्ही जर याला त्यांचे पुनरुज्जीवन मानत असाल, तर नीट विचार करा. कारण, जेव्हा मी पाच जागाही जिंकणार नाहीत असं म्हणालो होतो तेव्हा ते महाआघाडीत होते.

याचबरोबर प्रशांत किशोर यांनी लालू यादव यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, तेजस्वी यादव नेता बनले. मुस्लीम लालू यादव यांना मत यासाठी देत आहेत कारण, भाजपला मत देऊ शकत नाहीत. राजदने पत्र लिहून सांगितले की तुम्ही पक्ष सोडून जनसुराजमध्ये जाऊ नका. मात्र जे लोक राजदचे नेते होते ते आज जनसुराजमध्ये आले आहेत. लालू यादवांसाठी मुसलमान केवळ इंधनाप्रमाणे आहे, कारण जळत ते लोक आहेत आणि फायदा लालू यादवांचा होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT