Prashant Kishor Vs Lalu Prasad Yadav, Nitish Kumar Sarkarnama
देश

Prashant Kishor on Party Symbol : प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं, पक्षाचं निवडणूक 'चिन्ह स्कूल' बॅग का?

Prashant Kishor on Lalu Yadav and Nitish Kumar : लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यावरही केले आहेत आरोप, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor and Bihar Assembly By-Election : बिहारमध्ये चार जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. या निवडणुकीत प्रशांत किशोर (पीके) यांचा पक्ष जनसुराजनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या जनसुराज पक्षाला स्कूल बॅग हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे.

तर पक्षाला मिळालेल्या या चिन्हाबाबत बोलताना प्रशांत किशोर यांनी लालू प्रसाद यादव(Lalu Yadav) आणि नीतिश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, लालू नितीश कुमार यांच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात बिहारच्या मुलांच्या खांद्यावरून दप्तर काढून मजुरीचं गाठोडं बांधलं गेलं आहे.

प्रशांत किशोर(Prashant Kishor) म्हणाले की, जनसुराज पक्षाचा विचार आहे की, बिहारच्या लोकांची गरिबी दूर करण्याचा मार्ग शाळेची बॅग आहे. रोजगाराचा मार्ग आहे शाळेची बॅग. बिहारमधील तरुण बाहेर जाणं थांबवायचं असेल तर त्याचा मार्ग स्कूल बॅग आहे. त्यामुळेच जनसुराज पक्षाचं चिन्हं स्कूल बॅग आहे. कारण, शिक्षणामुळेच लोकांचा विकास होवू शकतो, गरिबी दूर होवू शकते.

या आधी जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी खुलासा केला होता की, ते कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्यास निवडणूक सल्लागार म्हणून सल्ला देण्यासाठी किमान 100 कोटी रुपये शुल्क घेत होते. हा खुलासा तेव्हा झाला जेव्हा ते 31 ऑक्टोबर रोजी बिहारच्या बेलागंजमध्ये एका सभेस संबोधित करत होते.

13 नोव्हेंबर रोजी तरारी, बेलागंज, इमामगंज आणि रामगढ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. तर मोतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. महाआघाडीच्यावतीने येथे आरजेडी आणि सीपीआय(एमएल) एका जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर एनडीए कडून भाजप दोन, जेडीयू आणि हम पार्टी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देत आहे. चारही जागांवर एकूण 38 उमेदवार आहेत. प्रशांत किशोर यांचा पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. त्यामुळेच सर्वांच्या नजरा जनसुराज पक्षाकडे आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT