Priyanka Gandhi, Lok Sabha Sarkarnama
देश

Priyanka Gandhi News : प्रियंका गांधी असणार 'वन नेशन-वन इलेक्शन' विधेयकासाठीच्या 'जेपीसी'चा भाग!

Congress on One Nation One Election : जाणून घ्या, आणखी कोणत्या काँग्रेस खासदारांची नावं आहेत जेपीसीसाठी चर्चेत?

Mayur Ratnaparkhe

Priyanka Gandhi and JPC for One Nation One Election : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर बनलेल्या 'जेपीसी'चा भाग राहणार असल्याची चिन्हं आहेत. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यासोबत काँग्रेसचे मनीष तिवारी, सुखदेव भगत आणि रणदीप सुरजेवाला हे देखील जेपीसीमध्ये सहभागी होवू शकतात.

मंगळवारी लोकसभेत वन नेशन वन इलेक्शनशी निगडीत विधेयक संसदेत सादर केलं गेलं होतं. नंतर मग ते जेपीसीकडे पाठवं गेलं. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत विधेयकास संघीय संरचनेच्या मूळ भावनेच्या विरोधात म्हटले होते.

संसद परिसरात मीडियाशी विशेष बातचीत करताना प्रियंका गांधींनी(Priyanka Gandhi) विधेयकास असंविधानिक म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, हे संघीय संरचनेच्या विरोधात आहे आणि आम्ही याचा विरोध करतो.

केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर(One Nation One Election) विरोधकांसोबत एकमत घडवायचे आहे. हेच कारण आहे की, विधेयकास चर्चेसाठी जेपीसीकडे पाठवलं गेलं. लोकसभेत विधेयक सादर केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान झाले. या दरम्यान विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मतं पडली. विरोधकांच्या विरोधानंतर दुसऱ्यांदा चिठ्ठीसह मतदान करण्यात आलं. तेव्हा विधेयकाच्या बाजूने 269 आणि विरोधात 198 मतं पडली होती.

घटना दुरूस्ती विधेयकासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. सध्या लोकसभेत 543 खासदार आहेत. अशावेळी विधेयकास पारीत करण्यासाठी 362 खासदारांच्या पाठिंब्याची गरज पडेल. एनडीए(NDA)कडे केवळ 292 जागा आहेत. तर राज्यासेभत दोन तृतीयांश बहुमतासाठी 164 खासदारांची आवश्यकता असेल आणि येथेही एनडीएकडे 112चं खासदार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT