Rahul Gandhi, PM Modi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : ''मी सगळा हिशेब ठेवतोय... ; राहुल गांधींचा PM मोदींना इशारा

Rahul Gandhi on PM Modis Murkho Ke Sardar Jibe : पंतप्रधान मोदींच्या टीकेला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं.

Sachin Fulpagare

Chhattisgarh Election 2023 : 'मूर्खांचे सरदार' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. निवडणुकीच्या एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी ही टीका केली. या टीकेवरून आता राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी मला फरक पडत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी जिथे जातात तिथे माझ्यावर शेलक्या भाषेत टीका करतात. चुकीच्या गोष्टी सांगतात. ठीक आहे, पण मला याने काहीच फरक पडत नाही. माझा उद्देश हा स्पष्ट आहे. यामुळे माझ्यावर त्यांनी कुठल्याही नावाने टीका केली तरी फरक पडत नाही. पंतप्रधान मोदी जेवढा पैसा अदानीला देतात तेवढाच पैसा गरिबांना देणं, हाच माझा उद्देश आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

मी हिशेब करतोय. तुम्ही एक रुपया अदानीला दिल्यावर एक रुपया मी गरिबांना देणार. जेवढा पैसा अदानीला तेवढा मी गरिबांना देणार. शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार आणि बेरोजगारांना निधी देणार. खरं राजकारण अब्जाधीशांना मदत केल्याने होत नाही, तर खरं राजकारण हे शेतकरी, मजूर, तरुण बेरोजगारांना आणि छोट्या दुकानदारांना मदत केल्याने होतं. हे मी दाखवून देईन. माझ्यावर काय टीका करायची ती करा, असं म्हणत राहुल गांधींनी एक प्रकारे पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे.

राहुल गांधी यांची आज छत्तीसगडमध्ये सभा झाली. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. या निवडणुकीत आता येत्या १७ तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी म्हणजेच निकाल ३ डिसेंबरला लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT