Rajasthan Exit Polls 2023 Sarkarnama
देश

Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये पाच संस्थांच्या सर्व्हेनुसार भाजपची सत्ता, तर तीन संस्थांची काँग्रेसला पसंती

Vijaykumar Dudhale

New Delhi : तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आज सायंकाळी ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले. राजस्थान विधानसभेबाबत वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे आकडे जाहीर होताना दिसत आहेत. आज तक-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. दुसरीकडे एबीपी न्यूज-सी व्होटरच्या अंदाजानुसार भाजपला स्पष्ट बहुमत दाखविण्यात आले आहे. (In Rajasthan, according to five institutions, BJP is in power, while three institutions favor Congress)

राजस्थान विधानसभेच्या १९९ मतदारसंघासाठी नुकतेच मतदान झाले. मात्र, तेलंगण विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. त्यात एबीपी न्यूज-सी व्होटरच्या अंदाजानुसार भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पोलनुसार ९४ ते ११४ जागा भाजप, काँग्रेसला ८१-९१, तर इतरांना १४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टीव्ही नाईन-पॉलस्ट्रेटच्या कलानुसार भाजपला १०० ते ११०, काँग्रेसला ९० ते ११० जागा, तर इतरांना ५ ते १५ जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे. भास्करच्या सर्व्हेनुसार भारतीय जनता पक्षाला ९८ ते १०५ जागा, काँग्रेसला ८५ ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आज तक-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये भाजपला ४१ टक्के, तर काँग्रेसला ४२ टक्के मतदान मिळाल्याचा अंदाज आहे. विधानसभेच्या १९९ जागांपैकी भाजपला ८०-१०० जागा, तर काँग्रेसला ८६ ते १०६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार दोन्ही पक्षांत काँटे की टक्कर दिसून येत आहे.

टाईम्स नाऊ-ईटीजी यांच्या सर्व्हेनुसार भाजपला बहुमत दाखविण्यात आले आहे. त्यात भाजपला १०८ ते १२८, तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागांचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. पी मार्क-रिपब्लिकच्या अंदाजानुसार काँग्रेसला ६९ ते ९१, भाजपला १०५ ते १२५ जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला पुन्हा बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यात पक्षाला ९४ ते १०४ जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. भाजपला ८० ते ९० जागांचा अंदाज आहे. ‘रिपब्लिक मेट्रीज’च्या अंदाजानुसार भाजपला बहुमत दर्शविण्यात आली आहे. त्यात पक्षाला ११५ ते १३० एवढं मोठं बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ६५ ते ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT