Rahul Gandhi | Narendra Modi | Akhilesh Yadav Sarkarnama
देश

Rajya Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश अन् हिमाचलमध्ये 'इंडिया'ला धक्का; कर्नाटकात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी

Akshay Sabale

Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात १५ जागांसाठी मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election 2024 ) मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. मते फोडल्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला ( Congress Rajya Sabha Election 2024 ) एकमेव उमेदवार निवडून आणता आला नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे आठ आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले.

हिमाचलमध्ये काँग्रेसच्या ( Congress ) सहा आणि सुक्खू सरकारला पाठिंबा देणाऱ्या तीन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तसेच, सरकारही अडचणीत आले आहे. येथे 40 आमदार असलेल्या काँग्रेस आणि 25 आमदार असलेल्या भाजपला 34-34 मते मिळाली. नंतर चिठ्ठी काढून भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना विजयी घोषित करण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशमध्ये संख्याबळानुसार भाजपचे ( bjp ) 7 उमेदवार जिंकून येत होते. 8 व्या जागेसाठी संख्याबळ नसतानाही संजय सेठ यांना उमेदवारी देण्यात आली. मतदानाआधी मंगळवारी सकाळीच समाजवादी पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार मनोज पांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी पक्षाच्या प्रतोदपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासह सात 'सप' आमदारांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले. तर, जया बच्चन, लालजी सुमन यांनी विजय मिळवला असला, तर आलोक रंजन यांना 16 मते मिळाल्यानं पराभव झाला.

कर्नाटकात 4 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अजय माकन, सय्यद नासिर हुसेन, जीसी चंद्रशेखर विजयी झाले. तर, भाजपचे नारायण बंदगे विजयी झाले. ऐनवेळी जनता दल ( धर्मनिपेक्ष ) ने उमेदवार उभा केल्यानं तिरंगी लढत झाली. भाजपचे आमदार हेब्बर जनता दलाच्या डी. कुपेंद्र रेड्डी यांना मत देण्याचे पक्षाचे आदेश डावलून गैरहजर राहिले. तर, आमदार टी. एस सोमशेखर यांनी काँग्रेसला मतदान केलं. त्यामुळे डी. कुपेंद्र रेड्डी यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT