Nanded Congress : नांदेडमध्ये काँग्रेसच्या बुडत्या जहाजाचा कॅप्टन होण्यासाठी स्पर्धा...

Competition for the post of District President : नव्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तीन माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याने काँग्रेसच्या गोटात अजूनही उत्साह कायम असल्याचे दिसून येते.
Nanded
NandedSarkarnama

Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस सलाईनवर आहे. अशा परिस्थितीतही काँग्रेसच्या या 'बुडत्या जहाजाचा कॅप्टन' होण्यासाठी स्पर्धा लागली आहे. नव्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तीन माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याने काँग्रेसच्या गोटात अजूनही उत्साह कायम असल्याचे दिसून येते.

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावी, अशी मागणी पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. या मागणीनंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पदासाठी तीन माजी आमदारासह अन्य पदाधिकारी उत्सुक आहेत.

भाजपमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षाने नांदेडची परिस्थिती हाताळण्यासाठी निरिक्षकांना पाठविले होते. या निरीक्षकांकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे.

भारतीय जनता पक्षात (BJP) चव्हाण यांच्यासोबत आजी - माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. पण जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Nanded
Manikrao Kokate News: आमदार कोकाटे अन् राजाभाऊ वाजे गटाला इशारा, तिसरी शक्ती 'उदयास' येणार?

नांदेड शहराध्यक्षपदी नुकतीच माजी महापौर अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी सभापती प्रकाश भोसीकर आदी उत्सुक आहेत.

नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा (Congress) गड म्हणून ओळखला जातो. पण ती परिस्थिती आता राहिली नाही. काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना आता अशोक चव्हाण यांच्याशिवाय जिल्ह्यात बळ वाढवण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. जिल्हातील निम्मा पक्ष चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेला आहे. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती अवघड झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणायचे असेल तर सक्षम व अशोक चव्हाण यांच्याशी दोन हात करणारा जिल्हाध्यक्ष द्यावा लागणार आहे. तसेच नव्याने निवडण्यात येणाऱ्या अध्यक्षाला पक्षाने पुर्ण पाठबळ दिले तरच जिल्ह्यात काँग्रेसचा टिकाव लागणार आहे.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर खासदारकी मिळवल्यानंतर नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनी संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसच्या 55 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची आख्खी महिला आघाडीही अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपवासी झाली आहे.

(Edited by Amol Sutar)

Nanded
Maratha Reservation : जरांगेंचे फक्त फडणवीसांवरच आरोप का? दानवे यांच्या प्रश्नाने भाजपची कोंडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com