Sanjay Raut Sarkarnama
देश

Sanjay Raut News : लुटमारीसाठीच पक्ष सोडून सरकार स्थापन ; ललित पाटील प्रकरण हिमनगाचं टोक..

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut News : राज्याच्या आरोग्य विभागात गोंधळ आणि भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. किमान आरोग्य खात्यात तरी भ्रष्टाचार होवू नये. हा गोरगरीब जनतेच्या जीवन मरणाचा, आरोग्याचा प्रश्न आहे. ठाकरे सरकारमध्ये लुटमारीला परवानगी नव्हती. त्यामुळे लुटमारीसाठीच एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पक्ष सोडला आणि सरकार स्थापन केले.

असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केले आहे. यासाठी पुराव्यासह साडेतीन हजार पानांचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून यावर कारवाई न झाल्यास मोठा स्फोट करावा लागणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, सरकारमधील एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि अजित पवार Ajit Pawar गटाचे मंत्री असलेल्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार, लुटमार सुरु आहे.

त्यातील आरोग्य विभाग हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे या खात्यातील भ्रष्टाचाराविषयी पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. सरकार जरी घटनाबाह्य असले तरी ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. खात्यात ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण हे हिमनगावरच टोक आहे.

डॅाक्टरांचे जे बॅास आहेत, ज्यांनी त्यांना करायला लावल आणि जे मंत्रालयात बसले आहेत ते दोन मंत्री त्यांच्या पर्यंत तपास पोहचू देणार आहेत का ? असा सवाल राऊत यांनी केला आहे. आज राज्यातील आररोग्य व्यवस्था कशा प्रकारे काम करते आणि कशी चालवली जाते. त्याच विश्लेषन करुन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल आहे.

वैद्यकीय अधिकारी, संचालक, उपसंचालक यांच्या बदल्या व बढत्या यांचे रेट काय आहे याची सविस्तर माहिती पत्रातून दिली गेली आहे. जळगावमध्ये २०२० च्या कोविड खरेदीत झालेल्या घोटाळ्यात अनियमितता झाली. त्यामध्ये संबंधित आधिकारी निलंबित झाले. पण आता तीन वर्षानंतर त्याला प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये फार मोठा व्यवहार झाला असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. पैसे गोळा करण्यासाठी उपसंचालक स्तरावरचे आधिकारी नेमले गेले आणि ते कात्रजला पोहचवले गेले. तेथे कोणत कार्यालय आहेत ते माहित आहे. आरोग्य खात्यात अमर्याद भ्रष्टाचार सुरु आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पोहचला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पावार गट यांच्या प्रत्येक मंत्र्याचे खात्यात दरोडेखोरी सुरु आहे.

महात्मा फुले आरोग्य योजना लागू करण्यासाठी प्रत्येक बेडमागे एक लाख रुपये खासगी रुग्णालयांकडून सरकारने वसुल केले आहेत. राज्यसभा सदस्य म्हणुन माझ्या आधिकारात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. याच उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झाली नाही तर यापेक्षा मोठ स्फोट मला करावा लागेल, असा इशारा राऊत यांनी सरकारला दिला.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT