Parli News : बीडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गेले काही महिने तारीख मिळत नव्हती. तारीख मिळाली तरी काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जात होता.बीडचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी हा कार्यक्रम थेट परळीला हलवला होता.तसेच या कार्यक्रमाच्या खर्चावरुनही विरोधकांनी विशेषत:राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकड़ून सडकून टीका करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. याच कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या बीडमधल्या परळीत झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव करतानाच विरोधकांवर टीकेची तोफ डागली.ते म्हणाले,पण त्यात परळीमधील आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी आणि रेकॉर्ड ब्रेक करुन दाखविला.परळीला येताना आम्हा तिघांसह पंकजा मुंडे आणि धनंजय यांनाही एकाच हेलिकॉप्टरमधून घेऊन आलो.यापुढे धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन बीडचा विकास करुन दाखवू असेही शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांचा आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत, त्या तळागळातल्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा कार्यक्रम आहे.पण पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले आहेत. याचवेळी मागील आठवड्यात झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आमच्या महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे.म्हणून काही जणांना पोटदुखी सुरू आहे अशी टीकाही शिंदेंनी यावेळी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशात पुन्हा नरेंद्र मोदीच यावर लोकांनी शिक्कामोर्तब केले आहेत. याचमुळे हे पोटशूळ असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गेल्या नऊ वर्षात मोदींनी एकतरी सुट्टी घेतली आहे का, एकतरी दिवाळी कुटुंबासोबत साजरी केली आहे का, असा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे हे आपलं भाग्य आहे, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला देखील त्यांच्या हक्क देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचेही ते म्हणाले.
तसेच काहीजण पत्रकार परिषदा घेऊन म्हणतात, शासन आपल्या दारी हा सरकारचा कार्यक्रम बोगस आहेत. पण या कार्यक्रमात अनेक लाभार्थी लाभ घेऊन गेले आहेत. पण अडीच वर्ष घरी बसून बोगसगिरी करणाऱ्यांना कष्टकरी,कर्मचारी,शेतकरी यांच्या वेदना काय कळणार असा टोलाही शिंदेंनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंडे बंधू-भगिनी यांना एक मोलाचा सल्ला दिला."तुम्ही असेच एकत्रीत राहा, आम्ही तिघे तुमच्या पाठीशी अशी ताकद उभी करू की, बीडचे आणि परळीचे कल्याण होईल ", असे सूचक विधान त्यांनी केले.याचवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच केंद्र सरकारसोबत बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.राजकीय जीवनात कुणीच कायमचं शत्रू नसतं,कायमचं मित्र नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. शाहू, फुले,आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे जात आहोत.इथे अनेकांच्या विचारधारा वेगवेगळ्या असतील, परंतु, शेवटच्या माणसला मदत झाली पाहिजे.
इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हे शासन माझ्यासाठी काम करतंय, असं सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे. ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सतत मनात असते आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो असल्याची भूमिकाही पवारांनी या कार्यक्रमात मांडली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.