Siddaramaiah Sarkarnama
देश

Telangana Election : निवडणूक तेलंगणामध्ये अन् आयोगाचा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला दणका, नेमकं काय घडलं?

Sachin Fulpagare

Telangana Election 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारच्या दैनिक जाहिरातींवर बंदी घातली आहे.

भाजपने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही बंदी घातली आहे. निवडणूक प्रभावित करण्यासाठी काँग्रेस सार्वजनिक निधीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला होता.

निवडणूक आयोगाने या प्रकरणी कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. आयोगाने उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणी कर्नाटक सरकारकडून उत्तर मागितले आहे. तसेच माहिती प्रसारण विभागाच्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई का होऊ नये? यावरही स्पष्टीकरण मागितले आहे. ( Assembly Elections 2023 )

दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अभिनेते आणि राजकीय नेता पवन कल्याण यांचा पक्ष जन सेना पार्टीसोबत युती केली आहे. बीआरएस आणि काँग्रेसला टक्कर देत भाजप राज्यात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. दक्षिणेतील एकमेव राज्यात असलेली भाजपची सत्ताही गेली. यामुळे भाजप नेतृत्वावर मोठी नामुष्कीही ओढवली होती. या पार्श्वभूमीवर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सतर्क असलेल्या भाजपने थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आणि काँग्रेस सरकारची तक्रार केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT