Modi- Shah- Nadda  Sarkarnama
देश

BJP Politics News : सत्ता मिळवली, पण आता भाजपची अग्निपरीक्षा ; मुख्यमंत्रिपदांचा तिढा कधी सुटणार ?

Assembly Elections Results 2023 : ...मात्र, आता खरी भाजप नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे.

Deepak Kulkarni

BJP News : देशातील पाचही महत्त्वाच्या राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच स्पष्ट झाले आहेत. त्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने मध्य प्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर काँग्रेसला फक्त तेलंगणात विजय मिळवता आला आहे. या विजयाचा जल्लोष एकीकडे सुरू असतानाच सत्ता स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे.

मात्र, आता खरी भाजप नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. कारण विजयी झालेल्या कोणत्याही राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे केला नव्हता. तर दुसरीकडे काँग्रेसने तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंथ रेड्डी यांच्या नावाची घोषणा करत भाजपवर कुरघोडीची संधी साधली आहे. त्यामुळे तीनही राज्यांचे मुख्यमंत्री ठरवताना भाजपची (BJP) मोठी कोंडी झाल्याची चर्चा आहे.

मिनी लोकसभा म्हणून पाहिले गेलेल्या या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालांनी एक्झिट पोलचे सर्व अंदाज फोल ठरवले. या निकालात मध्य प्रदेशात 163,राजस्थानमध्ये 115 तर छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकत भाजपने काँग्रेसला पराभवाची धूळ चारली.

तर तेलंगणात भाजपला मागील निवडणुकीतील 1 जागेवरुन 8 पर्यंत मजल मारता आली. या विजयामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण याचवेळी भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

भाजपने या पाचही राज्यांच्या निवडणकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) चेहरा आणि विकासकामांवर मते मागितली. यामुळे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावरुन निर्माण होणारा वाद टाळण्यात पक्षाला यश आले असले तरी आता भाजपची आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप कोणाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेश -

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये महंत बालकनाथ आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या नावे मुख्यमंत्री पदासाठी सध्या आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.पण या तीनही नावांवर पक्षश्रेष्ठींमध्ये जोरदार खल सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण येत्या काही दिवसांत भाजप नेतृत्व तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करु शकते.(Chief Minister)

मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांच्यासह प्रल्हाद पटेल,नरेंद्र सिंह तोमर कैलाश विजयवर्गीय,प्रल्हाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे या तीनही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या यादीत आघाडीवर आहे.

मोदी फॅक्टरसोबतच शिवराज सिंह यांच्या लोकप्रियतेनेही भाजपला कठीण वाटणार्या विजयासमीप नेल्यामुळे चारवेळा मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे

राजस्थान -

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, बाबा बालकनाथ,दिया कुमारी आणि गजेंद्रसिंह शेखावत ही दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे.यात वसुंधरा राजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वाटचालीत मोठा अडथळा म्हणजे त्यांचं पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी सूत जुळविण्यात अपयश आले आहे.

अशा परिस्थितीत पक्ष वसुंधरा राजे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यावर विचार करु शकते. तसेच गेहलोतानंतरचा राजस्थानमधील सर्वात पाॅप्युलर चेहरा म्हणून पुढे आलेल्या बालकनाथ यांना मुख्यमंत्री करुन भाजप धक्कातंत्र वापरु शकते.पण त्यांच्यासमोर वसुंधरा राजे यांचं आव्हान असणार आहे.

छत्तीसगड-

छत्तीसगडमध्ये डॉ. रमण सिंह हे छत्तीसगडमधील भाजप वरिष्ठ फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. पण त्यांचा वय सध्या ७१ वर्ष आहे.भाजपच्या स्ट्रॅटेजीनुसार मुख्यमंत्री होण्यात त्यांचे वयच अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तीनही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर भाजप कोणाला विराजमान करते हे पाहणे महत्वाची ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT